Video | आधी टकीला शॉट, मग नशेतच केला शृंगार, ‘या’ अभिनेत्रींचा मेकअप ट्युटोरियल इंटरनेटवर चर्चेत!

व्हिडीओमध्ये या दोन अभिनेत्री असणाऱ्या बहिणींनी असा प्रयोग केला आहे, जो कधीकधी तुम्हाला कधी हसवतो, तर कधीकधी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडू शकतो.

Video | आधी टकीला शॉट, मग नशेतच केला शृंगार, ‘या’ अभिनेत्रींचा मेकअप ट्युटोरियल इंटरनेटवर चर्चेत!
कायली आणि केंडल जेनर
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 1:41 PM

मुंबई : अमेरिकन टीव्ही स्टार्स बर्‍याच वेळा प्रयोगाच्या नावाखाली असे काही करतात की, त्यांचे चाहते इम्प्रेस होण्याऐवजी आश्चर्यचकित होतात. आपल्या चाहत्यांना बर्‍याचदा ‘शॉक मुमेंट्स’  देणाऱ्या कायली (Kylie Jenner) आणि केंडल जेनर (kendall Jenner ) यांनी आता त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये या दोन बहिणींनी असा प्रयोग केला आहे, जो कधीकधी तुम्हाला कधी हसवतो, तर कधीकधी तुम्हाला विचार करण्यास भाग पाडू शकतो (American stars Kylie Jenner and kendall Jenner getting drunk for their latest makeup tutorial).

पहिली नशा नंतर मेकअप!

इंटरनेटवर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये केंडल आणि कायली जेनर नशेच्या अवस्थेत त्यांचा मेकअप करत आहेत. प्रथम ते दोघे टकीला शॉटचे अनेक घोट घेतात आणि त्यानंतर मेकअप करण्यास सुरुवात करतात. हा व्हिडीओ शूट करताना कायली एका बाजूला बरीच आत्मविश्वासाने काम करताना दिसत होती, तर केंडल म्हणाली होती की, ती फक्त या व्हिडीओसाठी तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणार आहे. तो अगदी मजेशीर अंदाजात त्या म्हणाल्या की, त्यांना त्यांचे खास लिक्विड मिळाले आहे. व्हिडीओ जसजसा पुढे सरकतो, तसतसे या दोन्ही बहिणी वेगवेगळे लूक्स करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी वेगवेगळ्या रंगांची लिपस्टिक ओठांवर लावतात, तर कधीकधी डोळ्यांवर मेक-अप करण्याचा प्रयोग त्या करत आहेत.

पाहा त्यांचा चर्चित व्हिडीओ

 (American stars Kylie Jenner and kendall Jenner getting drunk for their latest makeup tutorial)

चर्चित व्हिडीओमध्ये आणखी काय?

व्हिडीओ दरम्यान, दोन्ही बहिणींचे गंमती आणि विनोद देखील पाहायला मिळतात. एकमेकांवर पाणी फेकण्यापासून ते मद्यधुंद होण्यापर्यंत आणि त्यांची भावना सामायिक करण्यापर्यंतच्या या गोष्टींनी, हा चर्चित व्हिडीओ बर्‍यापैकी मजेशीर बनला आहे. एका प्रसंगी, केंडल इतकी भावनिक झाल्याचे दिसून येते की, ती थेट तिच्या शाळेच्या आठवणीत रमते. ती सांगते की, 9वीच्या वर्गात असताना तिला मेकअप कसे करावे हे देखील माहित नव्हते. परंतु तरीही तिला एका मुलाला इम्प्रेस करायचे होते. अशा वेळी, ती तिच्या लूकची नेहमीच काळजी घेत होती. म्हणून, प्रत्येक वेळी ती तिच्या बहिणीला अर्थात कायलीला विचारायची की, ‘मी बरी दिसतेय ना? माझ्या चेहऱ्यावर मुरुम दिसत नाहीत ना?

चाहत्यांनाही बसला धक्का!

बरं पुढे या व्हिडीओत त्यांच्या या कथा सुरूच राहतात. परंतु, व्हिडीओच्या शेवटी, केंडल आणि कायली दोघांनी चाहत्यांना वेगळ्याच लेव्हलचा मेकअप ट्यूटोरियल दाखवला. असा एक ट्यूटोरियल जिथे त्या व्यक्ती स्वतःच शुद्धीत नव्हत्या, परंतु तरीही मेकअप कसा करावा, हे त्यांच्या चाहत्यांना शिकवत होत्या. तसे, केंडल आणि कायली जेनरच्या यूट्यूब चॅनेलवर असे बरेच व्हिडीओ आहेत, ज्यात त्या मेकअप ट्युटोरियल देताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या न ऐकलेल्या कथा सांगून चाहत्यांची करमणूक करत आहेत.

(American stars Kylie Jenner and kendall Jenner getting drunk for their latest makeup tutorial)

हेही वाचा :

Video | जान्हवी कपूर विसरा, जब्याच्या शालूचा ‘नदियो पार…’ अंदाज पाहा!

कियारा अडवाणी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, नुकतीच एकत्र घेतली होती ज्योतिष्याची भेट!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.