‘तू रावण नाही खिल्जी दिसतोस’ असं ट्रोलिंग पचवणाऱ्या सैफला आता ‘या’ हिंदू महाकाव्याचे वेध

| Updated on: Oct 07, 2022 | 3:59 PM

'आदिपुरुष'मधील सैफच्या रावण लूकवरून हंगामा; आता 'या' चित्रपटात काम करायची इच्छा

तू रावण नाही खिल्जी दिसतोस असं ट्रोलिंग पचवणाऱ्या सैफला आता या हिंदू महाकाव्याचे वेध
Adipurush
Image Credit source: Youtube
Follow us on

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) उदयभान सिंह राठोडची भूमिका साकारली. दिग्दर्शक ओम राऊतसोबत (Om Raut) त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर आता ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटानिमित्त दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं. रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. मात्र त्याच्या याच भूमिकेवरून सध्या जोरदार हंगामा सुरू आहे. ओम राऊतच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय.

आदिपुरुषच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेला रावण हा बाबर, तैमुर, औरंगजेब, अल्लाउद्दीन खिल्जी या मुघलांसारखा दिसतोय, अशी तक्रार नेटकऱ्यांनी केली. एकीकडे चित्रपटावरून हा वाद सुरू असताना आता सैफने ‘महाभारता’वर एखादा चित्रपट आल्यास, त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “जर कोणी लॉर्ड ऑफ द रिंग्स या हॉलिवूड चित्रपटासारखा महाभारत बनवणार असेल, तर त्यात मला काम करायला आवडेल. कच्चे धागे या चित्रपटात काम केल्यापासून मी अजय देवगणला याबद्दल बोलतोय. आताच्या पिढीसाठी हा ड्रीम विषय आहे. प्रत्येकाला अशा प्रोजेक्टमध्ये काम करायला आवडेल. यासाठी साऊथ इंडस्ट्रीसोबत मिळून काम करावं लागलं तर तसंही करू. पण महाभारतावर मोठा चित्रपट बनला पाहिजे.”

आदिपुरुष या चित्रपटात प्रभासने राम, सैफ अली खानने रावण आणि क्रिती सनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. तर हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.