Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ira Khan | बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आमीरची लेक म्हणतेय, ‘लॉकडाऊनसाठी तयार आहोत!’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमीर खानची लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अपडेट्स देत ​​असते.

Ira Khan | बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आमीरची लेक म्हणतेय, ‘लॉकडाऊनसाठी तयार आहोत!’
आयरा खान आणि नुपूर शिखरे
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 12:05 PM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमीर खानची लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अपडेट्स देत ​​असते. आयरा खान सध्या नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करत आहे आणि ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. काही दिवसांपूर्वी इराने नुपूरबरोबरचा एक फोटो शेअर केला होता आणि लॉकडाऊनसाठी तयार असल्याचे लिहिले होते. आता पुन्हा इराने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नुपूर बेडवर आराम करताना दिसला होता (Amir Khan daughter Ira Khan share romantic photo with boyfriend Nupur Shikhare).

आयराने सोशल मीडियावर नुपूरशी असलेल्या तिच्या नात्याची पुष्टी केली होती. तिने नुपूरबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, मी तुमच्याबरोबर आहे असे, मी अभिमानाने सांगू शकते. तथापि, नुकतेच आयरा ज्या प्रकारे नुपूरबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते, त्यावरून असे दिसते की आता ती आपले वैयक्तिक जीवन प्रत्येकासह शेअर करण्यास उत्सुक आहे.

पाहा आयरा खानची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by EntNetwrk (@entnetwrk)

आयराने आपली आई रीना दत्ता हिच्याशी नुपूरची ओळख करुन दिली आहे. रीनाला नुपूर खूप आवडला आहे. तिला त्यांच्या नात्यापासून कोणतीही अडचण नाही. काही दिवसांपूर्वी आयरा नुपूरला तिच्या चुलतभावाच्या लग्नालाही घेऊन गेली होती. ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला नुपूरजवळ आणत आहे (Amir Khan daughter Ira Khan share romantic photo with boyfriend Nupur Shikhare).

या व्यक्तीला करत होती डेट

आमीरची लेक आयरा नुपूर शिखरेच्या अगोदर मिशालला डेट करत होती. इराने मिशालबरोबर सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. पण नंतर काही काळानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

माझं नाव इरा नाही!

नुकताच आयरा खानने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितले की इरा हे तिचे खरे नाव नाही. तिने सांगितले की, सर्व चाहते आणि तिचे मित्र तिला इरा खान या नावाने हाक मारतात, पण तिचे खरे नाव इरा नसून त्याचा उच्चार आयरा असा आहे.

आयरा खान चित्रपट जगापासून बरीच दूर आहे. ती अद्याप बॉलिवूडमध्ये दाखल झालेली नाही. त्याच वेळी, सन 2019मध्ये ‘युरीपेडस मेडिया’ या नाटकाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.

(Amir Khan daughter Ira Khan share romantic photo with boyfriend Nupur Shikhare)

हेही वाचा :

Video| कंगना रनौत-तापसी पन्नूची दिलजमाई? पुरस्कार सोहळ्यात तापसीकडून कंगनाची स्तुती!

Kapil Sharma | कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! चौथीच्या पुस्तकात सामील झाली ‘कॉमेडी किंग’च्या संघर्षाची कहाणी