Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sulochana Latkar : माझ्या कुटुंबाचा आनंद हिरावला…. सुलोचना यांच्या निधनानंतर बिग बी शोकाकुल

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का बसला आहे.

Sulochana Latkar :  माझ्या कुटुंबाचा आनंद हिरावला.... सुलोचना यांच्या निधनानंतर बिग बी शोकाकुल
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:50 AM

Amitabh Bachchan Blog : सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत काम करणाऱ्या, आपल्या अभिनयाने रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांचे काल निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य भूमिका केल्या. तसेच अनेक हिंदी चित्रपटांत त्यांना अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, दिलीप कुमार यांच्यासह कामही केले. अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुलोचना यांच्या निधनाने बिग बींना मोठा धक्का बसला आहे. पडद्यावरील या आईच्या जाण्याने अमिताभ बच्चन शोकाकुल झाले आहेत. सुलोचना दीदी यांचे पार्थिव शरीर आज संध्याकाळी पाच वाजतापर्यंत प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होतील.

ब्लॉगवर व्यक्त केल्या भावना

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या दु:खद बातमीबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ आज आपण सिनेसृष्टीतील आणखी एका महान कलाकार सुलोचना जी यांना गमावले आहे. त्या एक सौम्य, दयाळू आणि काळजी घेणारी आई होती. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले…. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या.. आणि आज दुपारी आपल्या स्वर्गीय निवासासाठी त्या निघून गेली’ अशा शब्दांता बिग बी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. .

मी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होतो, त्यांच्या कुटुंबियांशीही संपर्कात होतो, असेही अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये नमूद केले होते. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने बिग बी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सुलोचना लाटकर यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. आपल्या कामाबद्दल बोलताना बिग बी म्हणाले की, आजही ते कामात होते, पण सुलोचना दीदी यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मावळला.

अमिताभ बच्चन यांच्यासह केले अनेक चित्रपटांत काम

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी अमिताभ यांच्यासोबत रेश्मा और शेरा (1971), याराना (1981), मुकद्दर का सिकंदर (1978), मजबूर आणि रोटी कपडा और मकान (1974) या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली.

दरम्यान अभिनेता रितेश देशमुख यानेही सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गेल्या काही दिवसांपासून सुलोचना दीदी श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.