ना रेखा, ना जया; ही होती अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड अन् पहिलं प्रेम; नाव जाणून विश्वास बसणार नाही, मात्र कारणामुळे झाला ब्रेकअप
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या प्रेयसीबद्दल हनीफ झवेरी यांनी केलेला खुलासा धक्कादायक आहे. जया आणि रेखा यांच्याआधीही अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक मुलगी होती जिच्यावर ते प्रचंड प्रेम करायचे पण अखेर या कारणामुळे अमिताभ यांना तिच्याशी ब्रेकअप करावा लागला.

अमिताभ बच्चन आता 82 वर्षांचे आहेत. या वयातही ते प्रचंड सक्रिय आहेत. या वयातही ते त्याच जोमाने काम करतात. शो करतात. अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांचं काम हीच त्यांची पहिली प्रायोरिटी आहे. अमिताभ बच्चन यांचे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण फॅन आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घ्यायला आवडतं.
अमिताभ बच्चन यांचं वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. आजही त्यांच्या जुन्या गोष्टींची आठवण काढली जाते. अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 52 वर्ष झाली आहेत. पण अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याचे किस्से आणि अफेअरच्या चर्चा त्यांच्या काळापासून ते आजपर्यंत सुरुच आहेत. एवढंच नाही तर जया आणि रेखा यांच्यातील मतभेदाचे, नाराजीचे किस्से आजही सांगितले जातात.
जया आणि रेखाच्या आधी अमिताभ यांच्या आयुष्यात एक मुलगी होती जी त्यांची गर्लफ्रेंड होती.
चित्रपटांमध्ये रेखा आणि अमिताभ यांची जोडी हिट मानली जाते. लोकांना त्या दोघांना पडद्यावर आणि वैयक्तिक आयुष्यात एकत्र पाहणे खूप पसंत आहे. तसेच रेखा अजूनही अमिताभ यांच्यावर अजूनही प्रेम करतात असं म्हटलं जातं. पण एका मुलाखतीत ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट उद्योगातील तज्ज्ञ हनीफ झवेरी यांनी अमिताभ यांच्या पहिल्या प्रेयसीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यावेळी अमिताभ चित्रपटसृष्टीतही फारसे सक्रिय नव्हते. जया आणि रेखाच्या आधी अमिताभ यांच्या आयुष्यात एक मुलगी होती जी त्यांची गर्लफ्रेंड होती.
अमिताभ बच्चन यांचं पहिलं अफेअर
हनीफ झवेरी यांनी या मुलाखतीत संभाषणादरम्यान सांगितलं की. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी अभिनयात आपले करिअर सुरू केले नव्हते तेव्हा ते कोलकात्यात काम करत होते. त्यावेळी ते एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. हनिफ म्हणाले, “अमिताभ बच्चन यांचं पहिलं अफेअर कोलकात्यात एका कंपनीत काम करत असताना सुरू झालं होतं. त्यावेळी त्याला कदाचित 250-300 रुपये मिळायचे. त्यावेळी माया नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात होती. ”
View this post on Instagram
अमिताभ यांना भीती होती की त्यांच्या आईला मायाबद्दल समजेल
हनीफ म्हणाले, “माया ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होती. अमिताभ तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तीही अमिताभवर खूप प्रेम करायची. ते एकमेकांना भेटायचे.” तथापि, जेव्हा अमिताभ आपल्या अभिनयाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांच्या नात्यात अनेक आव्हाने आली. जेव्हा अमिताभ बच्चन मुंबईत आले तेव्हा ते त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या जवळच्या मैत्रिणीच्या बंगल्यात राहिले होते. माया त्यांना भेटायला तिथे जात असे. अमिताभला भीती होती की त्यांच्या आईला मायाबद्दल समजेल. या कारणास्तव, अमिताभने ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.
माया कधीही बच्चन कुटुंबात फिट बसू शकणारी नव्हती
हनीफ पुढे म्हणाले की, त्यावेळी अमिताभ बच्चन. महमूद अलीचा भाऊ अन्वर अलीच्या “सात हिंदुस्तानी’ चित्रपटात काम करत होते. त्याने त्याची समस्या अन्वर अली यांना सांगितली. यानंतर, अन्वर अलीने त्याला महमूदच्या घरी राहण्यासाठी जागा दिली. माया आणि अमिताभ यांचे नाते चांगले होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यावेळी अमिताभ खूप लाजाळू होते आणि माया खूप धाडसी होती. तसेच अनवर अली यांनीच अमिताभ यांना मायापासून वेगळे होण्याचा सल्ला दिला होता. मायाचे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे होते आणि माया कधीही बच्चन कुटुंबात फिट बसू शकणार नव्हती. जेव्हा अमिताभला हे कळले की त्याचे आणि मायाचे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे आहे, तेव्हा अमिताभने हळूहळू मायापासून स्वतःला दूर केलं आणि अखेर दोघांचे ब्रेकअप झालं” अशापद्धतीने हनीफ झवेरी यांनी अमिताभ यांच्या पहिल्याप्रेमाबद्दल सर्वच खुलासा केला.