जया-अमिताभ बच्चन यांचा बँक बॅलेन्स किती? संपत्तीची सर्व माहिती आली समोर

| Updated on: Feb 15, 2024 | 1:45 PM

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी मिळून 1578 कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. यात 17 कार आणि 130 कोटी रुपयांपेक्षा अधिक बँक बॅलेन्सचाही समावेश आहे. 2018 मध्ये जया यांनी बिग बी आणि त्यांची मिळून एकूण मालमत्ता 1000 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.

जया-अमिताभ बच्चन यांचा बँक बॅलेन्स किती? संपत्तीची सर्व माहिती आली समोर
अमिताभ बच्चन, जया बच्चन
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 15 फेब्रुवारी 2024 | बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची जोडी इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. वयाची 80 पार केलेले बिग बी अजूनही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय ते ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनसुद्धा करतात. यातूनही त्यांची चांगली कमाई होते. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी जया बच्चन या नुकत्याच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकल्या होत्या. त्या राजकारणातही सक्रिय आहेत. जया बच्चन यांनी एका निवडणूक शपथपत्रात आपल्या आणि पतीच्या संपत्तीविषयीची माहिती दिली होती. बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांची एकूण संपत्ती किती आहे, ते पाहुयात..

2022-2023 या वर्षातील अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची संपत्ती

‘बिझनेस टुडे’च्या एका रिपोर्टनुसार, 2022-2023 या वर्षांत जया बच्चन यांनी आपली एकूण संपत्ती 1.63 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलंय. तर दुसरीकडे या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रुपये इतकी आहे. शपथपत्रात असाही खुलासा करण्यात आला आहे की जया यांचा बँक बॅलेन्स 10.11 कोटी रुपये इतका आहे. तर बिग बींकडे जवळपास 120.45 कोटी रुपये आहेत. या दोघांची संपत्ती मिळून 849.11 कोटी रुपये इतकी आहे. बिग बी आणि जया यांची स्थावर मालमत्ता 729.77 कोटींच्या घरात आहे.

हे सुद्धा वाचा

अमिताभ-जया यांचं कार कलेक्शन आणि दागिने

जया बच्चन यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या वाहनांची, दागिन्यांची माहितीसुद्धा या अॅफिडेविटमध्ये दिली आहे. जया बच्चन यांच्याकडे 9 लाख रुपयांच्या गाड्या आहेत. तर बिग बींकडे 17 कोटी रुपयांचं कार कलेक्शन आहे. यामध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. जया यांच्याकडे 40 कोटी रुपयांचे दागिने आहेत तर बिग बींकडे 54 कोटी रुपयांचे दागिने आहेत.

अमिताभ आणि जया यांची कमाई कुठून होते?

अमिताभ बच्चन हे त्यांची पत्नी जया आणि संपूर्ण कुटुंबासोबत मुंबईतील ‘जलसा’ या आलिशान बंगल्यात राहतात. याशिवाय मुंबईत त्यांची इतरही संपत्ती आहे. अमिताभ आणि जया यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घरं आहेत. नुकतीच बिग बींनी अयोध्येत जमीन विकत घेतल्याची चर्चा होती. कमाईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जया बच्चन या जाहिराती, संसदेतून मिळणारा पगार आणि अभिनयातून मिळणारी रक्कम यातून बराच पैसा कमावतात. तर दुसरीकडे बिग बींच्या उत्पन्नामध्ये व्याज, भाडं, लाभांश, भांडवल नफा, सोलार प्लांड यांमधून मिळणाऱ्या महसुलाचा समावेश आहे.