Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

| Updated on: Feb 28, 2021 | 11:25 PM

अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन एक माहिती दिली आहे. (Amitabh Bachchan laser eye surgery)

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर
Amitabh Bachchan
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन एक माहिती दिली आहे. या माहितीमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच झटका बसला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्ब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली आहे. (Amitabh Bachchan laser eye surgery)

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. शनिवारी बिग बींनी याबाबतची माहिती दिली होती. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार प़डली आहे. त्यामुळे आता चाहत्यांविषयी चिंता करण्याची काहीच नाही. अमिताभ बच्चन हे उद्या घरी परतणार आहेत.

बॉलिवूड हंगामा यांनी दिलेल्या बातमीनुसार, बिग बींना मोतीबिंदू झाला होता. त्याची शस्त्रक्रिया आज पार पडली. ते काही वेळात ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतील, अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या मित्राने दिली होती.

नुकतंच अमिताभ बच्चन यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये एका ओळीत लिहिलं की, ‘मेडिकल कंडिशन, सर्जरी… यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही.’ बिग बी यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अनेकांनी ते लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहे.

‘झुंड’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

दरम्यान अमिताभ बच्चन हे सध्या झुंड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी झुंड चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी त्यांनी हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. झुंड हा चित्रपट येत्या 18 जूनला रिलीज होणार आहे. (Amitabh Bachchan laser eye surgery)

संबंधित बातम्या : 

Marathi Movie : ‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’,बाजीप्रभूंचा पराक्रम झळकणार रुपेरी पडद्यावर

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ