मजा नही आया… ऐश्वर्याबद्दल बिग बी हे काय बोलून गेले ? आजही या विधानाची का होतेय चर्चा?
अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांच्यात एक खास बॉन्ड आहे. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. अभिषेकसोबत लग्नाआधीपासूनच ऐश्वर्या अमिताभचा खूप आदर करत होती. पण एकदा मेगास्टारने ऐश्वर्याबद्दल असं विधान केलं ज्याची आजही चर्चा ... काय होतं ते विधआन, बिग बी काय म्हणाले ?
अमिताभ बच्चन ये हे त्यांच्या अभिनयाप्रमाणेच नम्रपणसाठी बरेच प्रसिद्ध आहेत, ते नेहमी मोठ्यांचा आदर करतात. त्यांचं कुटुंब हे सदैव त्यांच्यासाठी अग्रस्थानी असतात. अशीच शिकवण त्यांनी आपल्या मुलांनाही दिली आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबाबाबत विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबत वेगळी रहात असल्याचीही चर्चा आहे. अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर वेगाने फिरत आहेत.
मात्र याच ऐश्वर्या रायबद्दल अनेक वर्षांपूर्वी बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांनी असं विधान केलं होतं, ज्याची आजही चर्चा होत असते. अनेक वर्ष उलटून गेली पण बिग बी यांच्या तोंडून निघालेले ते शब्द लोकं विसरू शकलेले नाहीत. खरं तर, ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाचा भाग नव्हती. अमिताभ आणि ऐश्वर्याने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अभिषेकसोबत लग्नाआधीही ऐश्वर्याला अमिताभ यांच्याबद्दल खूप आदर होता.
20 वर्षांपूर्वी काय घडलं ?
त्या दोघांनी एकत्र अनेक पिक्चर्समध्ये काम केलं आहे. त्यातील एक चित्रपट होता ‘क्यों हो गया ना’. रोमँटिक ड्रामा असलेला हा चित्रपट 2004 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यामध्ये ऐश्वर्या, अमिताभ बच्चन आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी बिग बींनी ऐश्वर्यावर अशी काही कमेंट केली होती, जे आजही कोणीच विसरू शकलेलं नाही, त्याची आजही चर्चा होत असते.
ऐश्वर्याचे काका होते अमिताभ
या पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका फार मोठी नव्हती, पण ती खूप महत्त्वाची होती. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अनाथाश्रमाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आणि ऐश्वर्या त्यांना अंकल म्हणायची. हीच चित्रपटाच्या स्क्रिप्टची मागणी होती. त्याच वेळी, ऍशच्या तोंडून स्वतःसाठी ‘अंकल’ ऐकून अमिताभ हे थोडे चिडले होते. ऐश्वर्या सारख्या सुंदर महिलेकडून काका अशी हाक ऐकणं बिग बी यांना फारसं रुचलं नाही.
मजा नाही आली , बिग बी यांचं विधान चर्चेत
ऐश्वर्यासोबत काम करून कसं वाटलं , असा सवाल याच चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान अमिताभ यांना विचारण्यात आला होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ गमतीने म्हणाले की, ‘ ॲशसोबत काम करताना मला आनंद होत नाही. तिच्यासोबत काम करताना मजा नाही आली’. पण तेवढ्यात ते पुढे म्हणाले की, ‘ ऐश्वर्या इतकी सुंदर आहे, की तिच्या काकांची भूमिका साकारून मला बिलकूल आनंद नाही झाला’. त्यानंतर बिग बी यांनी तिच्या कामाचं खूप कौतुकही केलं.