‘एक-एक करून सगळे सोडून जात आहेत’; अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट

| Updated on: Apr 21, 2023 | 2:11 PM

यश चोप्रा यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पामेला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

एक-एक करून सगळे सोडून जात आहेत; अमिताभ बच्चन यांची भावूक पोस्ट
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्यासोबत बरीच वर्षे काम केलेले अमिताभ बच्चन पामेला चोप्रा यांच्या निधनाच्या वृत्ताने भावूक झाले. बिग बींनी गुरुवारी रात्री भावूक पोस्ट लिहिली आणि चोप्रा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. प्रोजेक्ट के या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्यानंतर ते गेल्या काही दिवसांपासून घरीच आराम करत होते. गुरुवारी त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्याच दिवशी यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांच्या निधनाची बातमी समोर आली. ‘आयुष्य जागच्या जागी थांबलंय’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

‘त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला होता. चित्रपट निर्मिती, संगीतांच्या बैठका, घरातील आणि घराबाहेरील गेट टुगेदर.. सर्वकाही एका क्षणात निघून गेलं. एक एक करून सर्वजण सोडून जात आहेत. आपल्यामागे ते एकत्र घालवलेले सुंदर क्षण सोडून गेले आहेत’, असं बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं. अमिताभ बच्चन हे गुरुवारी मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह पामेला यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले होते. आयुष्य खूप कठीण आणि अंदाज न लावता येण्यासारखं आहे, असंही बिग बी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यश चोप्रा यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पामेला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेता उदय चोप्रा ही पामेला यांची मुलं आहेत. तर अभिनेत्री राणी मुखर्जी ही त्यांची सून आहे. पामेला यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्हेंटिलेटरवर होत्या.

1976 मधील ‘कभी कभी’पासून ते 2002 मधील ‘मुझसे शादी करोगी’पर्यंत असंख्य गाणी पामेला चोप्रा यांनी गायली आहेत. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आईना’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. त्याचसोबत त्यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि लेखिका तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. या चित्रपटातील एका सीनमध्येसुद्धा त्या झळकल्या होत्या. ‘एक दुजे के वास्ते’ या गाण्याच्या ओपनिंग सीनमध्ये पामेला पतीसोबत दिसल्या होत्या.