मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांनी ९० च्या दशकात बॉलिवूड गाजवलं.. इंडस्ट्रीमध्ये आज असंख्य अभिनेत्यांनी प्रवेश केला, पण बिग बी यांची जागा कोणताही अभिनेता घेवू शकला नाही आणि ते शक्य देखील नाही. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत असंख्या सिनेमे केले. आजही त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते असतात. पण बिग बी यांच्याबद्दल खास गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम’ सिनेमा असंख्य गोष्टींमुळे चर्चेत राहिला. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमात अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, शिल्पा शिरोडकर, डॅनी डेन्जोंगपा, अनुपम खेर आणि कादर खान यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहच्यांचं मनोरंजन केलं…
महत्त्वाचं म्हणजे त्या काळी ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १६.८ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. सिनेमातील डायलॉग्स आणि काही सीन आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. विशेषतः ‘जुम्मा चुम्मा’ गाण्याने सर्वाच्या मनावर राज्य केलं. आजही कोणत्याही कार्यक्रमात ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर चाहते ताल धरतात. गाण्याच्या कोरिओग्राफची जबाबदारी चिन्नी प्रकाश यांच्या खांद्यावर होती..
‘जुम्मा चुम्मा’ या गाण्यामुळे चिन्नी प्रकाश यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा पुरस्कारही मिळाला. पण गाण्यातील सिग्नेचर स्टेप बिग बी यांनी आवडली नव्हती. म्हणून अमिताभ बच्चन यांनी स्टेप बदलण्यासाठी सांगितलं. पण गाण्याच्या ओळीवर ती सिग्नेचर स्टेप योग्य असल्याचं चिन्नी प्रकाश यांनी सांगितलं..
चिन्नी प्रकाश यांनी गाण्याच्या सिग्नेचर स्टेपबद्दल मोठा खुलासा केला.. गाणं फायल होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांनी डान्स करुन दाखवला आणि जया बच्चन यांना सिग्नेचर स्टेप आवडली.. बिग बींनी सिग्नेचर स्टेप आवडली नव्हती, पण त्यांनी जया बच्चन यांचा होकार मिळाल्यानंतर सिग्नेचर स्टेप करण्यास तयारी दाखवली. सिग्नेचर स्टेपबद्दल जया बच्चन म्हणाल्या, ‘अनेक वर्ष ही स्टेप चाहत्यांच्या लक्षात राहिल…’ अशा प्रकारे ‘जुम्मा चुम्मा’ गाणं चित्रीत करताना घडलेला किस्सा चिन्नी प्रकाश यांनी एका मुलाखतीत सांगितला.
महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी लवकरचं ‘प्रोजेक्ट K’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात बिग बींसोबत अभिनेता प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘प्रोजेक्ट K’ सिनेमा ५०० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा भारतातील सर्वांत जास्त बजेट असलेला सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘प्रोजेक्ट K’सिनेमा १२ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.