हरिवंश राय बच्चन यांचं घर विकलं, तिथं कवितांची रंगायची मैफील; कोट्यावधी रूपयांना विकलं
बच्चन कुटुंबियांचे देशात अनेक ठिकाणी चांगले संबंध आहेत हे आजवर आपण पाहिले आहे. तसेच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचे आपण पाहतो.
मुंबई – अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कारकीर्द 1970 नंतर बहरत गेली. त्यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की लोकांनी अमिताभची स्टाईल, कपडे, बोलण्याची पध्दत सुध्दा अनुसरली असल्याचे मागील अनेक दशकात पाहायला मिळाले आहे. दिल्लीत अमिताभ बच्चन यांच्या आई वडिलांचं सोपान नावाचं घर असल्याची माहिती मिळतेय. तिथं अनेक दिवस हरिवंशराय बच्चन (Harivanshi Rai Bachchan) आणि तेजी बच्चन (Teji Bachchan) यांचं वास्तव होतं. तिथलं घर अमिताभ बच्चन यांनी विकल्याची वृत्त ईटाईम्सने दिलं आहे. दिलेल्या वृत्तानुसार उत्तर दिल्लीत गुलमोहर पार्कमध्ये हे घर होतं. त्या घराचं नाव सोपान होतं. ते घर जवळपास 23 करोड रूपयाला विकल्याची माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांची देशात अनेक ठिकाणी घरं आहेत. त्याचबरोबर लोणावळा इथं मोठं फार्म हाऊस देखील आहे.
यांनी घेतलं घर
बच्चन कुटुंबियांचे देशात अनेक ठिकाणी चांगले संबंध आहेत हे आजवर आपण पाहिले आहे. तसेच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचे आपण पाहतो. त्यांच्या संबंधित व्यक्तीने दिल्लीतलं सोपन नावाचे घर 23 करोड रूपयाला घेतले आहे. तिथं अमिताभ यांच्या आई-वडिलांचं वास्तव होतं. नेझोन ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ अवनी बादर यांनी सोपान नावाचं घर खरेदी केलं असून त्यांनी आमच्या कुटुंबियांचे बच्चन फॅमिलीचे संबंध अधिक चांगले असल्याचे सुध्दा म्हणटले आहे. हे अत्यंत जुनं बांधकाम आहे. हे जुनं बांधकाम पाडून आम्ही तिथं आमच्या पध्दतीने बांधकाम करणार असल्याचे अवनी बादरने सांगितले. त्याचबरोबर आम्ही त्या परिसरात खूप वर्षापासून राहत असून आम्ही आमच्या परिसरात अधिक मालमत्ता शोधत होता. जेव्हा ही ऑफर आम्हाला समजली तेव्हा आम्ही तात्काळ ती खरेदी करण्याचं ठरवलं असं अवनी बादराने ईटाईम्सला सांगितले आहे.
घरात हरिवंश राय बच्चन यांच्या आठवणी
हे घर अत्यंत जुनं आहे, तिथं हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांचं अधिक वास्तव राहिलेलं आहे. तिथं अनेकदा कविताचे कार्यक्रम झाल्याच्या काही नोंदी आहेत. अमिताभ बच्चन यांनी सुध्दा तिथं वास्तव केलं आहे. अमिताभ बच्चन हिंदी सिनेमात येण्याआगोदर तिथंच राहत होते. सध्या विकलेले घर दुमजली होतं तिथं अनेकदा कविताचे कार्यक्रम झाल्यामुळे ते घरं अनेकांच्या माहितीचं आहे. अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.