पैचान कौन ? ब्लँक अँड व्हाईट फोटोमधील या प्रसिद्ध व्यक्तींना ओळखलंत का ? सांगा पाहू नावं..
Bollywood's Famous Family : बॉलीवूडमध्ये अशी अनेक खास कुटुंबे आहेत, ज्यांचे केवळ फिल्मी दुनियेतच नाही तर राजकारण आणि व्यावसायिक जगतातही विशेष नाव आहे. असे 3 प्रसिद्ध लोक या फोटोत दिसत आहेत. तुम्ही त्यांना ओळखू शकता?
मुंबई : फिल्मी दुनियेत असे अनेक खास चेहरे आहेत, ज्यांच्या नावाने चित्रपट (movies) चालतात. या कलाकारांचा चेहरा आता एक ब्रँड (face is a brand) बनला आहे, जो पाहून प्रेक्षक आकर्षित होतात. जर तुम्हाला या स्टार्सचे बालपणीचे फोटो दाखवले गेले तर तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. अशाच एका सुपरस्टारचा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो सुपरस्टार त्याच्या आईसोबत दिसत आहे. या फोटो त्या स्टारसोबत त्याचा लहान भाऊही दिसत आहे. फोटोत दिसणारे हे तीन चेहरे खास असून तिघांचीही स्वतःची वेगळी ओळख आहे.
फोटोमध्ये दिसणार्या महिलेबद्दल एक हिंट देऊ शकतो. ही महिला त्यांच्या काळातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती होती आणि त्यांचा राजकीय व्यक्तींसोबतही वावर होता. एवढेच नव्हे तर त्यांचे पती हे प्रसिद्ध कवी-लेखक होते, ज्यांच्या कविता आजही लोकांना खूप आवडतात. याशिवाय फोटोत मागे दिसणारा मुलगा हा बॉलिवूडचा प्राण आहे. तर, लहान मुलगा हे व्यावसायिक जगतात मोठे नाव आहे.
सायकॉलॉजीच्या प्राध्यापिका…
आतापर्यंत तुम्हाला हे प्रसिद्ध कुटुंब कोणाचं याचा अंदाज आला असेल. पण तुम्हाला अजूनही हे ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतो. फोटोतील ही महिला म्हणजे तेजी बच्चन या असून त्यांच्यासोबत बॉलिवूडचे शहनेशहा अमिताभ बच्चन आणि त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन आहेत. हरिवंशराय बच्चन यांचे हे कुटुंब सामाजिक, बॉलीवूड आणि बिझनेस जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एकदा हा फोटो शेअर केला होता. तेजवंत कौर सूरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1914 रोजी झाला. त्या मानसशास्त्राच्या शिक्षिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या होत्या. हरिवंशराय हे इंग्रजीचे व्याख्याते होते. तेजी आणि हरिवंश राय यांची भेट लाहोरमधील एका महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यान झाली.
अमिताभ आणि अजिताभ हे आपापल्या दुनियेतील स्टार
अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी प्रयागराज येथे झाला. अमिताभ यांनी अभिनयविश्वात नाव कमावण्याचा निर्णय घेतला आणि 1969 मध्ये आलेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अँग्री यंग मॅन म्हणून ओळख मिळालेल्या अमिताभ यांनी त्यांच्या अष्टपैलू अभिनयाने विविध भूमिका अजरामर केल्या आणि बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले. त्यांना मिलेनियम स्टारचा दर्जा मिळाला आहे. कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची पत्नी जया बच्चन याही अभिनेत्री असून त्यांना अभिषेक आणि श्वेता बच्चन ही दोन मुलं आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय ही त्यांची सून आहे.
तर अमिताभ यांचे धाकटे भाऊ अजिताभ नेहमीच लाइम लाईटपासून दूर राहिले. अजिताभ यांचा जन्म 18 मे 1947 रोजी प्रयागराज येथे झाला. अजिताभ हे अमिताभ यांच्यासोबत मुंबईत राहू लागला. सुरुवातीच्या टप्प्यात ते अमिताभ यांचे मॅनेजर म्हणून सर्व काम पाहत असत. यानंतर ते लंडनला गेले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला. अजिताभ हे आज बिझनेस जगतात मोठे नाव झाले आहे.