Amitabh Bachchan | शाहरूखने दिलेलं ते वचन अजूनही अपूर्णच… बिग बींनी सांगितला ‘तो’ किस्सा
कौन बनेगा करोडपती हा अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित शो सुरू झाला आहे. त्यामध्ये बिग बी यांनी शाहरूख व त्याची पत्नी गौरी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) छोट्या पडद्यावर पुन्हा परत आले आहेत. कौन बनेगा करोडपती (KBC) चा नवा सीझन ते प्रेक्षकांसाठी घेऊन आले असून या शोधमध्ये ते बऱ्याच वेळेस त्यांच्या आयुष्याशी निगडीत एखादी गोष्ट किंवा किस्सा सांगत असतात.
यावेळी बिग बी यांनी KBC 15 मध्ये अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. किंग खान अर्थात शाहरूखने त्यांना एक वचन दिले होते, ते अद्याप पूर्ण केलेल नाही, असे ते म्हणाले.
शाहरूखने कोणतं वचन दिलं होतं ?
खरंतर , या शोमध्ये आलेल्या एका स्पर्धकाला अमिताभ बच्चन यांनी एक प्रश्न विचारला होता. ‘माय लाइफ इन डिझाइन’ या पुस्तकाची लेखिका कोणाची पत्नी आहे ? असा प्रश्न विचारत त्यांनी शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार आणि चेतन भगत, असे चार पर्याय स्पर्धकाला देण्यात आले होते. स्पर्धकाने त्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले, ते होते – अभिनेता शाहरूख खान.
त्यावर बिग बी यांनी तत्काळ उत्तर दिले आणि सांगितले की हे गौरी खान हिचे नवे पुस्तक असून तिने तिच्या प्रवासाबद्दल यामध्ये लिहीले आहे.
अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
पुढे बिग बी यांनी शाहरूख व गौरीशी संबंधित एक किस्साही सांगितला. ते म्हणाले, त्यांनी जेव्हा किंग खानची व्हॅनिटी व्हॅन पाहिली, तेव्हा ते खूप इंप्रेस झाले. त्यांना ती खूपच आवडली. त्यामध्ये टीव्ही, खुर्च्या, स्लायडिंगटे दरवाजे, मेकअप रूम आणि वॉशरूम देखील होते.
बिग बींच्या कौतुकांनंतर शाहरूखने सांगितले की ही व्हॅन त्याची पत्नी, गौरी हिनी डिझाईन केली आहे. मी गौरीला, तुमच्यासाठी देखील अशीच एक व्हॅनिटी व्हॅन डिझाईन करायला सांगेन, असे आश्वासन शाहरूखने अमिताभ यांना दिले. पण ती (व्हॅनिटी डिझाइन करण्याची) वेळ अद्याप आली नाही, असे अमिताभ यांनी हसत हसत सांगितले.
शाहरुख खान आणि अमिताभ यांचं नातं खूप स्ट्रॉंग असून ते चांगला बाँड शेअर करतात. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम याला असं वाटलं होत की अमिताभ बच्चने हे शाहरूखचे वडीलच आहेत, खुद्द शाहरूखनेच हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता.