ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम… अमिताभ बच्चन यांनी ट्विटरकडे हात जोडून केली विनंती !
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राजकारण्यांपासून खेळाडूंपर्यंत आणि सेलिब्रिटीपासून सामान्य यूजर्सपर्यंत सर्वांचेच ब्ल्यू टिक हटवले आहे. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिकही हटवण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
![ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम... अमिताभ बच्चन यांनी ट्विटरकडे हात जोडून केली विनंती ! ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम... अमिताभ बच्चन यांनी ट्विटरकडे हात जोडून केली विनंती !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/04/21205657/amitabh-bachchan-1.jpg?w=1280)
नवी दिल्ली : मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) एका झटक्यात सर्व यूजर्सचे ब्ल्यू टिक (Blue tick )हटवले आहेत. राजकारणी, खेळाडू, अभिनेते, कोणी कोणी यातून सुटलेलं नाही. ही ब्ल्यू टिक गेल्याने अनेकांची लिगसी एका झटक्यात धाडकन कोसळली आहे. बॉलिवूडचे बिग बी अर्थाच अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सदैव सक्रिय असतात. मात्र ट्विटरने त्यांचेही ब्ल्यू टिक हटवले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘ अरे ट्विटर भाऊ, ते निळं कमळ ✔ असतं ना आमच्या नावापुढे, ते परत लावून टाका ना. म्हणजे लोकांना समजू शकेल की हे अकाऊंट माझंच आहे. आता आम्ही हात जोडतो ‘ अशा शब्दांत अमिताभ यांनी ट्विटरला हात जोडून विनंती केली आहे.
T 4623 – ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम … तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं – Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा ?जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रियंका गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू विराट कोहली या सर्वांची ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. आता ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी असेल त्यांना रक्कम भरून ब्ल्यू टिक मिळवावी लागणार आहे.
ट्विटरचा सर्वेसर्वा एलन मस्क यांनी 12 एप्रिल रोजीच एक घोषणा केली होती. 20 एप्रिलपासून ब्ल्यू टिक हटवली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आज रात्रीपासूनच ही ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना पैसे खर्च करावे लागणार आहेत. मंथली प्लान घ्यावा लागणार आहे. त्यानंतर या लोकांना ब्ल्यू टिक मिळणार आहे.
कुणाकुणाची ब्ल्यू टिक गेली
संजय राऊत राहुल गांधी प्रियंका गांधी योगी आदित्यनाथ एकनाथ शिंदे मायावती नितीश कुमार प्रकाश आंबेडकर पृथ्वीराज चव्हाण अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान अक्षयकुमार आलिय भट्ट रोहित शर्मा विराट कोहली महेंद्रसिंह धोनी एमके स्टॅलिन नाना पटोले नितेश राणे
त्यांचे ब्ल्यू टिक कायम
दरम्यान, काही सेलिब्रिटी, खेळाडू, इतर यूजर्स आणि नेत्यांचे ब्ल्यू टिक कायम ठेवण्यात आले आहेत. त्याचं कारण म्हणजे या लोकांनी ब्ल्यू टिकसाठी पेमेंट केला आहे. ज्यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजले आहेत, त्यांची ब्ल्यू टिक कायम ठेवण्यात आली आहे, असं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. टेस्लाचे एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. एलन मस्कने 44 अब्ज डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले होते.
कुणाची ब्ल्यू टिक कायम
उद्धव ठाकरे
अजित पवार
राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस
अतुल लोंढे
राष्ट्रवादी
किती पैसे मोजावे लागणार ?
ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी आहे किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची आहे त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होतं. मोबाईल यूजर्ससाटी दर महिन्याला 900 रुपये भरावे लागणार आहेत.