अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर लाखो, करोडो चाहते प्रेम करतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष असते. अमिताभ यांनी केलेली एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत असून या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; चाहते बिग बींच्या प्रकृतीबद्दल चिंतेत
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 8:29 PM

संगम शहर प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहेत. कडाक्याच्या थंडीतही भक्तांची श्रद्धा कमी पडताना दिसत नाहीये.

सर्वसामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटी देखील महाकुंभ दर्शनासाठी गेले आहेत. याच दरम्यान आता अमिताभ बच्चन यांनीही याबद्दल एक पोस्ट केली आहे. पण या पोस्टवरून मात्र अनेकांना त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत आहे.

अमिताभ यांची पोस्ट व्हायरल, चाहत्यांना चिंता

संगम शहर प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असली तरी महाकुंभाबद्दल लोकांचा उत्साह कमी झालेला दिसत नाही. यावेळी बॉलीवूड सेलिब्रिटी आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह अमिताभ बच्चन देखील या भव्य महोत्सवात सहभागी होऊ शकतात, असे वृत्त आहे.

अमिताभ यांना चाहत्यांकडून थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला

दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांनीही X हॅंडलवरून महाकुंभ संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांन त्यांच्या तब्येतीची चिंता सतावू लागली असून त्यांनी अभिनेत्याला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

अमिताभ बच्चन यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी X पोस्ट करत लिहिले आहे “महाकुंभ स्नान भव:”. यानंतर बिग बींच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे. त्यांच्या पोस्टवरून त्यांना “महाकुंभामध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याचं दिसून येत आहे. पण थंडीमुळे अमिताभ यांच्या प्रकृतीचीही लोकांना काळजी वाटू लागली. खूप थंडी असल्याने काळजी घ्या असा सल्ला चाहत्यांनी दिला.

अमिताभ यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर एका यूजरने कमेंट करत विचारलं आहे की, “सर, तुम्ही अंघोळ केली आहे का?”, तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “हर हर महादेव, जय सत्य सनातन धर्म. साहेब, तुम्ही थंडीपासून वाचा”,

तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “बच्चनजी तुम्हाला श्रद्धाच्या महाकुंभातील पवित्र स्नानानिमित्त खूप खूप शुभेच्छा.” याशिवाय अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत तेथील कडाक्याच्या थंडीमध्ये आपली तब्येत सांभाळण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.

थंडी असली तरी महाकुंभातील भाविकांचा उत्साह काही कमी नाही

महाकुंभाबद्दल बोलायचे झाले तर कडाक्याची थंडी असूनही कुंभमेळ्याचा उत्साह भाविकांमध्ये कमी झालेला नाहीये. महाकुंभात स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगमावर भाविक मोठ्या उत्साहात जमा होत आहेत.

या विशेष प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय परदेशातूनही लोक कुंभात स्नान करण्यासाठी येत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.