‘जलसा’बाहेर चाहत्याच्या हातात विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…बिग बींनी जे केलं त्याने जिंकली सर्वांची मने

दर रविवारप्रमाणे असंख्य चाहते अमिताभ यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा अमिताभ यांनी जलसा बंगल्याबाहेर येत चाहत्यांची भेट घेतली. यावेळी एका चाहत्याने त्यांच्यासाठी आणलेल्या मूर्तीला पाहून अमिताभ यांनी जे केलं त्याचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.

‘जलसा’बाहेर चाहत्याच्या हातात विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्...बिग बींनी जे केलं त्याने जिंकली सर्वांची मने
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 1:50 PM

सर्वांनाच हे माहित आहे की महानायक अमिताभ बच्चन हे दर रविवारी जलसा बंगल्याबाहेर जाऊन त्यांच्या चाहत्यांना भेटतात. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी चाहते काहीना काही त्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असतात. अशाच एका चाहत्याने त्यांसाठी आणलेल्या खास आणि सुंदर मूर्तीला पाहून अमिताभ यांनी जे केलं त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत.

अमिताभ यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्षात पाहता यावं अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असतेच. तसेच दर रविवारी अमिताभ बच्चन हे सुद्धा आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. त्यासाठी ते दर रविवारी  जलसाबाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतात.

दर रविवारी असंख्य चाहते त्यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर जमतात. अमिताभ बच्चनदेखील आपल्या चाहत्यांना भेटायला बाहेर येतात. चाहत्यांशी संपर्क साधतात. चाहते त्यांच्यासाठी काहीना काही भेटवस्तू आणतच असतात.  ज्या काही भेटवस्तू चाहते आणतात, त्या ते स्वीकारतात. अनेकदा ते स्वतः देखील चाहत्यांसाठी भेटवस्तू आणतात. अशाच चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्याने अमिताभ यांच्यासाठी आणलेल्या खास आणि सुंदर मूर्तीला पाहून अमिताभ यांनी जे केलं त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत.

नेहमीप्रमाणे या रविवारीदेखील त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. बिग बींनी बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. हात उंचावून आणि हात जोडून त्यांनी चाहत्यांची भेट घेतली. याच दरम्यान त्या गर्दीत एका चाहत्याने विठ्ठलाची मूर्ती आणली होती. त्याने ती मूर्ती बिग बी यांच्यासमोर दोन्ही हाताने उंचावली. जेव्हा बिग बींचे लक्ष त्या मूर्तीकडे गेले तेव्हा त्यांनी लगेचच दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत आहेत. अनेकांनी यावर हार्ट इमोजी देत कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान अमिताभ यांच्या एका झलकसाठी किंवा त्यांना एकदा पाहण्यासाठी चाहते रविवारची वाट पाहत असतात.

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16’ होस्ट करत आहेत. तसेच ते अलिकडेच ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेत पाहायला मिळाले.

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.