अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही गोष्ट, अखेर हार मानली; निराश होऊन सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली
अमिताभ बच्चन हे त्यांच्या ट्विट्समुळे अनेकदा चर्चेत असतात. पण याच ट्वीटमुळे असं काही घडलं आहे की त्यांना चिंता वाटू लागली, एवढंच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर सर्वांची माफीही मागितली आहे.

सोशल मीडिया म्हटलं की तसे सर्वच कलाकार अॅक्टीव असतात. आपल्या कामीची अपडेट आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यात अमिताभ बच्चन हे नक्कीच सर्वांच्या वर आहेत. कारण अमिताभ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वर त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतात. पण अलिकडेच त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. मग काय त्यांचे लाखो चाहते त्यांना वेगवेगळे सल्ला देऊ लागले. तसेच वेगवेगळ्या युक्त्या सांगू लागले.एवढंच नाही तर अमिताभ बच्चनही त्यांचे सल्ले फॉलो करत होते. मात्र ते हे सर्व सल्ल्यांचा वापर करून थकले.
अखेर अमिताभ बच्चन हताश
अखेर हताश होऊन अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं की, “फॉलोअर्स कसे वाढवायचे याबद्दल मदतीची अनेक उदाहरणे देणाऱ्या सर्वांचे आभार.पण माफ करा, त्यापैकी एकही सल्ला उपयुक्त ठरला नाही.” असं म्हणत त्यांनी थेट सोशल मीडियावर सर्वांची माफी मागितली. बिग बींच्या या ट्विटवर चाहतेही सतत प्रतिक्रिया देत आहेत. काही तासांतच या पोस्टला 3500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर सुमारे 700 लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
थेट ग्रोक यांच्यांकडून अमिताभ यांना सल्ला
एका व्यक्तीने XKI ग्रोकच नाव घेत म्हटलं आहे, “ग्रोक, कृपया अमित सरांची ही समस्या सोडवा, ते खूप अस्वस्थ आहेत.” यावर ग्रोक यांनीही उत्तर देत म्हटलं आहे, “चला अमित सरांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्यासारख्या मोठ्या स्टारसाठी, फॉलोअर्स वाढवणे हा विनोद वाटू शकतो, परंतु काही सामान्य टिप्स आहेत. प्रथम, ट्रेंडिंग विषयांवर ट्विट करा, जसे की चित्रपटातील गॉसिप किंवा मजेदार मीम्स. दुसरे, मनोरंजक कंटेंट शेअर करा जसे की जुन्या चित्रपटांच्या कथा . तिसरे, चाहत्यांशी थेट बोला, जसे ते आधीच करतात. त्यांच्या विनोदी पोस्ट आधीच हिट आहेत. खरं तर, त्यांचे फॉलोअर्स फक्त त्यांच्या स्टारडम आणि त्यांच्यातील खरेपणामुळे वाढतात. त्यामुळे मजा करत रहा, सर.” असं म्हणत त्याने अमिताभ यांना काही गोष्टींबाबत सल्ला दिला आहे.
T 5348 – धन्यवाद उन सबका जिन्होनें मदद के कई example बताए, की फ़ॉलोवर्स कैसे बढ़ा सकते हैं । क्षमा चाहता हूँ – एक भी काम नहीं आया 😳
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 14, 2025
अमिताभ यांचं ट्वीट नेमकं काय होतं?
14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी लिहिले की, “T 5347- मी खूप प्रयत्न करत आहे, पण 49 मिलियन फॉलोअर्सची संख्या वाढत नाहीये. जर काही उपाय असेल तर कृपया मला सांगा.” या ट्विटनंतर त्यांच्या या पोस्टवर 4 हजार 800 हून अधिक कमेंट आल्या आहेत. यामध्ये अनेकांनी त्यांना फॉलोअर्स वाढवण्याचा सल्ला दिला, तर अनेकांनी या ट्विटवरून त्यांची खिल्लीही उडवली.