मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला सध्या रसिक प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. आता या मालिकेत अत्यंत भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. ज्या माऊने या जगात पाऊल ठेवण्या आधीपासून फक्त आणि फक्त तिरस्कार सहन केला त्या माऊला आता मुलगी म्हणून घरात हक्काचं स्थान मिळणार आहे. (An emotional twist to the series ‘Mulgi Jhali Ho’)
लहानपणापासून माऊनं सहन केला तिरस्कार
खरंतर दुसरीही मुलगी झाली म्हणून माऊला मुलगी म्हणून तिच्या वडिलांनी कधी स्वीकारलं नाही इतकंच काय तिचं तोंडही पाहिलं नाही. तिला लहानपणापासून हीन वागणूक मिळाली. गाईगुरांच्या गोठ्यात ती लहानाची मोठी झाली. वंशाला दिवा हवा या हट्टासापायी माऊच्या वडिलांनी आणि आजीने तिला घरापासून लांब ठेवलं.तिनं ही वागणुक सहन केली आहे.
पोटच्या मुलानं दिल्यानं विलासला कळली माऊची किमंत
पण पोटच्या मुलाने जेव्हा दगा दिला तेव्हा विलासच्या मागे सावलीसारखी उभी राहिली ती माऊ. माऊच्या या त्यागाची खरी किंमत आता विलासला कळली आहे. म्हणूनच सन्मानाने या लेकीला तो तिच्या हक्काच्या घरी आणणार आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील हे वळण नव्या बदलाची नांदी आहे. आजही बऱ्याच ठिकाणी मुलीचा जन्म म्हणजे अपराध मानला जातो. या मानसिकतेला विचार करायला भाग पडणारं मालिकेतील हे वळण असेल. लक्ष्मीच्या पावलांनी माऊचा गृहप्रवेश होणार आहे. तेव्हा बाप लेकीच्या नात्याची ही गोष्ट पाहायला विसरू नका.
संबंधित बातम्या