Shahrukh Khan | 57 व्या वर्षीही शाहरूखचा धमाकेदार डान्स, आनंद महिंद्राही झाले हैराण, म्हणाले…
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचे नवे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणं पाहून प्रख्यात उद्यगोपती आनंद महिंद्रा हेही खूप इंप्रेस झाले आहेत. त्यांनी शाहरूखच्या डान्सबद्दल...

Anand Mahindra On Jawan New Song : अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh Khan) ‘जवान‘ हा (Jawan Movie) चित्रपट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. चाहतेही बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाची वाट बघत आहेत. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित कोणतेही अपडेट आल्यावर फॅन लगेच एक्साइट होतात. नुकतंच या चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे गाणंही रिलीज झालं असून त्यामध्ये 57 व्या वर्षीही शाहरूखने धमाकेदार डान्स करत धमाल केली आहे. त्याचा डान्स पाहून सर्वच हैराण झाले आहेत.
विख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे देखील शाहरूखचा परफॉर्मन्स पाहून थक्क झाले आहेत. या वयातही तूफान नाचणाऱ्या शाहरूखचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
शाहरूखचा डान्स पाहून आनंद महिंद्रा यांचं ट्विट
‘जिंदा बंदा’ हे शाहरूखच्या चित्रपटातील नव गाणं रिलीज होताच खूपच लोकप्रिय झालं आहे. दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही यूट्यूबवर म्यूझिकमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याला आतापर्यंत 44 मिलियन व्ह्यूज आले आहेत. या गाण्यातील शाहरुखचा डान्स पाहून चाहत्यांसोबतच उद्योगपती आनंद महिंद्राही खूप खुश आहेत. त्यांनी एक ट्विट करत या वयातही उत्तम डान्स करणाऱ्या शाहरूखचे खुलेआम कौतुक केले आहे. ‘हा हिरो 57 वर्षांचा आहे ?? त्याचे वय तर ग्रॅव्हिएशनल फोर्सेसलाही मात देत आहे. हा इतरांपेक्षा १० पट जास्त चैतन्यशील आहे. #ZindaBanda हो तो ऐसा..!’ अशा शब्दांत त्यानी शाहरुखच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
This hero is 57 years old?? Clearly his ageing process defies gravitational forces! He’s 10X as alive as most people. #ZindaBanda ho to aisa… pic.twitter.com/3Qaa2iC30U
— anand mahindra (@anandmahindra) August 1, 2023
शाहरुखने दिलं खास उत्तर
शाहरुख त्याच्या अभिनयासोबतच सेन्स ऑफ ह्युमर, नॉलेज यासाठीही ओळखला जातो. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर शाहरुखनेही खास त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे. आनद महिंद्रांचे ट्विट रीट्विट करत त्याने लिहीले आहे की ‘ सर, आयुष्य अतिशय छोटंसं आणि खूप वेगवान आहे. मी फक्त त्याच्यासोबत (आयुष्यासह) चालण्याचा प्रयत्न करत आहे. जास्तीत जास्त लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी हसणं, रडणं किंवा उडणं… जे शक्य आहे ते करण्याचा माझा प्रयत्न असतो.’ अशा शब्दांत शाहरूखने त्याच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
@anandmahindra Life is so short and fast sir, just trying to keep up with it. Try and entertain as many whatever it takes….laugh..cry…shake…or fly…hopefully make some to swim with the stars….dream for a few moments of joy. https://t.co/3bP8Xth1yG
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 2, 2023
या तारखेला रिलीज होणार चित्रपट
7 सप्टेंबर रोजी ‘जवान’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ॲटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूख सोबतच नयनतारा आणि थलपति विजय मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.