Anant-Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी Rihannaची हजेरी, परफॉर्मन्ससाठी किती फी घेणार माहित्ये ?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनची धामधूम सुरू झाली आहे. या फंक्शनसाठी गुजरातच्या जामनगरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकाराही या फंक्शनला उपस्थित राहणार असून प्रसिद्ध गायिक रिहाना हिचाही खास परफॉर्मन्स होणार आहे.

Anant-Radhika Pre Wedding : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी Rihannaची हजेरी, परफॉर्मन्ससाठी किती फी घेणार माहित्ये ?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 9:38 AM

Anant-Radhika Pre Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लाडका मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. जुलैमध्ये त्यांचा विवाह होणार असला तरीही आजपासू ( १ मार्च) गुजरातमधील जामनगर येथे प्री-वेडिंग फंक्शनला सुरूवात होणार आहे. अंबानी कुटुंबातील या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून देशातील अनेक नामवंत व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासह हॉलिवूडचेही अनेक सेलिब्रिटी, इंटरनॅशनल कलाकारही कार्यक्रमाचा आनंद लुटतील. या सोहळ्यासाठी सेलिब्रिटी, नामवंत व्यक्ती जामनगर येथे दाखल झाल्या असून त्यामध्ये सलमान खान, राणी मुखर्जी, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण यांचाही समावेश आहे.

या सोहळ्यात सर्वांचे लक्ष अनंत -राधिकाच कडे असले तरी अंबानी कुटुंबाने त्यांच्यासाठी एक खास सरप्राईज आयोजित केले आहे. या सोहळ्यासाठी हॉलिवूडची फेमस सिंग रिहान हीदेखील उपस्थित राहणार असून तिचे नुकतेच जामनगरमध्ये आगमन झाले. ती या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये खास परफॉर्मन्सही देणार आहे. अनंत-राधिकाच्या फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानाने तगडी रक्कम फी म्हणून आकारली आहे. तिची फी किती आहे माहीत आहे का ?

एका परफॉर्मन्ससाठी रिहानाची फी किती ?

हे सुद्धा वाचा

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, प्रीतम, बी प्राक, दिलजीत दोसांझ, हरिहरन आणि अजय-अतुल यांचा परफॉर्मन्स पहायला मिळमार आहे. तर आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना या यादीत टॉप लिस्टवर आहे. रिहाना ही जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. गुरुवारी रिहानाचे जामनगर विमानतळावर आगमन झाले, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

बार्बेडियन गायिका, बिझेनसवुमन आणि अभिनेत्री असलेल्या रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी मोठी फी आकारली आहे. त्याबद्दल गुप्तता पाळण्यात आली असली तरी रिपोर्ट्सनुसार, प्रायव्हेट इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहाना ही 12 ते 66 कोटी रुपये, इतकी फी आकारते.

रिहानाच्या रिहर्सलचे व्हिडीओ व्हायरल

या सर्व चर्चांदरम्यान , या परफॉर्मन्सपूर्वी रिहानाच्या रिहर्सलचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरंतर, रिहाना तिची टीम आणि तिच्या स्टेज प्रॉप्ससह आली आहे. ती काल संध्याकाळी उशिरा साऊंड चेकसाठी आणि तिच्या बहुप्रतिक्षित परफॉर्मन्सपूर्वी रिहर्सल करण्यासाठी स्टेजवर पोहोचली. त्या कार्यक्रमस्थळाचे दोन व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत, ज्यामध्ये रेहानाच्या परफॉर्मन्ससाठी मोठा स्टेज तयार करण्यात आल्याचे दिसत आहे.

या गाण्यांवर रिहाना थिरकणार ?

त्या व्हिडीओमधून तिच्या परफॉर्मन्सची झलकही पहायला मिळाली. त्यापैकी काही गाणीही समोर आली आहे. ‘डायमंड्स’ या तिच्या हिट गाण्यावर ती नक्कीच परफॉर्म करेल. ‘ऑल ऑफ द लाइट्स’ हे गाणही ती सादर करेल अशी चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘बी***एच बेटर हॅव माय मनी’, ‘बर्थडे केक’, ‘राइट नाऊ’, ‘वाइल्ड थॉट्स’, ‘स्टे’ आणि ‘लव्ह’ या गाण्यांचाही समावेश असेल, अशी माहिती मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.