Anant Amabni-Radhika Merchant : किती शिकलीय अंबानींची भावी सून राधिका ? अनंतकडे आहे कोणती डिग्री ?

अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांच्या घरचे सगळेच कसे जगतात, त्यांचं रूटीन काय असतं, त्यांना काय आवडतं, या सगळ्यांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. सध्या तर अंबानी कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची लेक राधिक यांचं लवकरच लग्न होणार आहे

Anant Amabni-Radhika Merchant : किती शिकलीय अंबानींची भावी सून राधिका ? अनंतकडे आहे कोणती डिग्री ?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 11:36 AM

मुंबई | 1 मार्च 2024 : अंबानी कुटुंब नेहमीच चर्चेत असतं. देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि त्यांच्या घरचे सगळेच कसे जगतात, त्यांचं रूटीन काय असतं, त्यांना काय आवडतं, या सगळ्यांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. सध्या तर अंबानी कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची लेक राधिक यांचं लवकरच लग्न होणार आहे. जुलैमध्ये हा विवाह होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यापूर्वी गुजरातच्या, जामनगरमध्ये आजपासून ( 1मार्च) त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सना सुरूवात झाली आहे.

त्यामळे सर्वांच्या मनात अंबानींच्या या भावी सुनेबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायची उत्सुकत आहे. राधिक मर्चंट नेमकी कोण आहे, तिचं शिक्षण किती ? आणि तिचं ज्याच्याशी लग्न ठरलंय , त्या अनंत अंबानी यानेही कोणती डिग्री घेतली आहे ते जाणून घेऊया.

किती शिकलीय अंबानींची भावी सून राधिका ?

हे सुद्धा वाचा

अनंत अंबानी याची होणारी पत्नी राधिक मर्चंट हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रसिद्ध उद्योगपती, एन्कॉर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची लाडकी असलेली राधिका ही बी-टाऊन सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, राधिकाने मुंबईतील जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मॉन्डिएल वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी राधिका न्यूयॉर्कमध्ये गेली. विशेष म्हणजे राधिका मर्चेंट हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारण या विषयात पदवी घेतली.

बिझनेसवुमन आहे राधिका

राधिका मर्चंटला एक बिझनेसवुमनही आहे. ग्रॅज्युएशननंतर, राधिकाने सुमारे एक वर्ष इसप्रवा या लक्झरी रिअल इस्टेट कंपनीत काम केले. या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर तिची नियुक्ती झाली. व्यवसायाच्या दुनियेतील राधिकाचा प्रवास एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. त्यानंतर, तिने तिच्या वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तिने एन्कोर हेल्थकेअर जॉईन केलं. राधिकाला नागरी हक्क, पशु कल्याण, शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, मानवाधिकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातही खूप रस आहे.

अनंतकडे कोणती डिग्री ?

राधिकाचा होणार पती आणि मुकेश अंबानी यांचा लाडका लेक अनंतने धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. तिथे ब्राईन युनिव्हर्सिटीमधून त्याने डिग्री घेतली. नंतर अनंत याने आई-वडिलांची साथ देत फॅमिली बिझनेस जॉईन करत जबाबदारी स्वीकारली. सध्या, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या न्यू एनर्जी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या यादीत अनंतचा समावेश आहे.

जुलैमध्ये होणार विवाह

2022 साली अनंत आणि राधिका यांची साखरपुडा झाला. यावर्षी त्यांचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची धामधूम जोरात सुरू आहे. सर्वजण त्यांच्या विवाहाची आतुरतेने वाट पहात आहेत. सध्या जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. यासाठी हॉलिवूड-बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.