मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात बॉलीवूडच्या चमचमत्या ताऱ्यांची नेहमी हजेरी असते. आता मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल यांनी काही दिवसांपूर्वी जंगी पार्टी आयोजित केली होती. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाची ही पार्टी होती. कृष्णा आणि आदिया यांना एक वर्ष पूर्ण झाल्याने 18 नोव्हेंबरला ही पार्टी झाली. यावेळी अनेक बॉलीवूडच्या हस्ती हजर होत्या. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही यावेळी उपस्थित होता.
सोशल मिडीयावर शाहरुख खान फॅन या खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख मुकेश अंबानीचे अनंत अंबानींसोबत पहायला मिळत आहेत. या व्हिडीओला खूप पाहीले जात आहे. कारण या व्हिडीओत अनंत अंबानी किंग खानच्या हातात अजगराचे पिल्लू देताना दिसत आहेत. परंतू किंग खान अजिबात विचलित न होता बिनधास्त पोझ देताना दिसत आहे. आरामात उभ्या असलेल्या किंग खानची छायाचित्र फोटोग्राफर काढीत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
तेवढ्यात पाठीमागून आणखी एक साप किंग खानच्या गळ्यात अडकवताना दिसत आहे. परंतू तरीही खान चलबिचल न होता बिनधास्त पोझ देताना दिसत आहेत. हा किंग खानचा हा अंदाज पाहून त्याचे चाहते खूष झाले आहेत. किंग खान यांनी केस मानेपर्यंत वाढलेले असून त्यांनी काळा गॉगल लावला आहे. या पार्टीत कॅटरीना कैफ, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर आणि करण जोहर यांनी आपल्या दोन्ही मुलांसह सहभाग घेतला होता.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुखचा हा अंदाज त्याच्या फॅनला खूष करणार आहे. हे वर्ष शाहरुखला चांगले गेले आहे. आधी पठान ने छप्परफाड कमाई केली. त्यानंतर जवान ने बॉक्स ऑफीस झेंडे गाडले आहेत. शाहरुखने सलमान खानच्या टायगर -3 पाहूणा कलाकार म्हणून छोटी भूमिका केली आहे. त्याच्या हा रोलची खूप तारीफ केली जात आहे.