आज मुंबईत एक महत्त्वाचा लग्न सोहळा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच आज लग्न आहे. राधिका मर्चेंट सोबत अनंत अंबानी यांची आयुष्यभरासाठी गाठ बांधली जाणार आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील जियो वर्ल्ड सेंटर येथे हे लग्न होणार आहे. या लग्नासाठी देश-विदेशातून पाहुणे आले आहेत. लग्नासाठी जे परदेशी पाहुणे आलेत, त्यांच्या निवासाची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय काही VVIP पाहुण्यांना खास घड्याळाच्या रुपाने कोट्यवधी रुपयांच गिफ्ट मिळणार आहे. अन्य पाहुण्यांसाठी काश्मीर, राजकोट आणि वाराणसीतून स्पेशल गिफ्ट मागवण्यात आले आहेत. बांधनीची ओढणी आणि साडी असे गिफ्टस या लग्नात असतील.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा खास काळजी घेतली आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या निमित्ताने रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना स्पेशल गिफ्ट बॉक्स देण्यात आला आहे. रिलान्सच्या अनेक कर्मचाऱ्यांनी गिफ्ट बॉक्सचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या या गिफ्ट बॉक्सवर सोनेरी अक्षरात लिहिलेलं आहे. “देवी-देवतांच्या ईश्वरी आशिर्वादाने आम्ही अनंत-राधिकाच लग्न सेलिब्रेट करतोय. निता-मुकेश अंबानींकडून शुभेच्छा” या बॉक्सच्या आता हल्दीराम नमकीनचे चार पॅकेट आहेत. आलू भुजिया शेव आणि चिवडा आहे. मिठाईचा बॉक्स आहे. चांदीच नाणं आहे.
या लग्नासाठी 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शेफ
या लग्नासाठी 10 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शेफना बोलवण्यात आलं आहे. इंडोनेशियाची कोकोनट कॅटरिंग कंपनी 100 पेक्षा जास्त नारळी पदार्थांच्या डिश बनवणार आहे. 2500 पेक्षा जास्त डिश मेन्यू लिस्टमध्ये आहेत. काशीचा चाट आणि मद्रास कॅफेची फिल्टर कॉफी सुद्धा यामध्ये आहे. इटालियन आणि यूरोपियन स्टाइल फूड सुद्धा असेल. इंदूरच गराडू चाट, मुंगलेट आणि केसर क्रीम वडा सुद्धा मेन्यूमध्ये असेल. देशाच्या वेगवेगळ्या भागातून स्पेशल फूड स्टॉल लावण्यात येतील.