Anant-Radhika Wedding : लग्नात पाण्यासारखा पैसा ओतला, आता हनीमूनची तयारी; अनंत आणि राधिका ‘या’ पाचपैकी एका देशात जाऊ शकतात हनीमूनला
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा काल पार पडला. त्यासाठी देश-विदेशातले अनेक सेलिब्रिटी हजर होते. मात्र सध्या चर्चा सुरु झालीय ती म्हणजे अनंत राधिकाच्या हनिमूनची. ते दोघे कुठे फिरायला जाऊ शकतात, यावर अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचे काल थाटामाटत लग्नात झाले आहे. काल जिओ वर्ल्डमध्ये शाही विवाहसोहळ्यात अनंत-राधिक यांनी सप्तपदी घेतल्या. त्या दोघांच्या भव्य लग्नासाठी देश-विदेशातील मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. या जोडप्याचे लग्न इतके भव्यदिव्य होते की तो राजेशाही थाट पाहून अनेकांना राजे-महाराजांची आठवण आली. मात्र आता त्यांचा विवाह सोहळा पार पडल्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे ती अनंत-राधिकाच्या हनीमूनची . लग्नाचा इतका शाही थाट पाहून त्यांच्या चाहत्यांना दोघांचे हनिमुनचे ठिकाण नेमंक कोणत असेल? अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. ते फिरण्यासाठी कोणत्या डेस्टिनेशची निवड करतात याची सर्वांनाच उत्सुकता असून त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. ‘या’ पाचपैकी एका देशात अनंत-राधिका जाऊ शकतात अशी चर्चा आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
कुठे फिरायला जाणार अनंत राधिका ?
अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स यावर्षी मार्चमध्ये सुरू झाले. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसरे प्री-वेडिंग फंक्शन आयोजित केले गेले. इटलीमध्ये एका मोठ्या क्रूझवर ती पार्टी झाली होती. यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यातच सर्व पारंपरिक विधी पार पडले. मामेरू, संगीत, हळद, मेहंदी अशी फंक्शन्स झाल्यावर अखेर काल (12 जुलै) त्या दोघांच लग्न झालं. अनंत आणि राधिका आता अधिकृतपणे पती-पत्नी बनले आहेत आणि त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्यास तयार आहेत, त्यामुळे त्यांच्या हनीमूनचीही चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
फिजी आयलंड – अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नानंतर त्यांच्या रोमँटिक हनीमूनसाठी फिजी आयलंडवर जाऊ शकतात. येथे अनेक आलिशान बेटे आहेत. नवविवाहित जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
साउथ अफ्रीका – अनंत आणि राधिका त्यांच्या हनीमूनसाठी दक्षिण आफ्रिकेचा पर्यायही निवडू शकतात. तेथे ते रोमँटिक वातावरणाचा आनंद घेऊ शकतात आणि येथील सुंदर खोऱ्यांमध्ये क्वॉलिटी टाईम स्पेंड करू शकतात.
स्वित्झर्लँड – हनीमूनला जाणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी स्वित्झर्लँड हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. तेथील बर्फाच्छादित पर्वत, लेक जिनिव्हा, लेक ल्युसर्न सारखे सुंदर तलाव मनाला भुरळ घालतात. येथील हिरव्यागार कुरणात अनेक जोडपी रोमँटिक वॉकचा आनंद घेतात. अनंत-राधिका या नवविवाहित जोडप्यासाठी हे योग्य हनिमून डेस्टिनेशन असू शकते.
बोरा बोरा आयलंड – बोरा बोरा आयलंड ही जागा मधुचंद्रासाठी स्वर्गासमान आहे. तेथील तलाव, ओव्हरवॉटर बंगले आणि ट्रॉपिकल ब्युटीसाठी प्रसिद्ध आहेत. तेथेही अनंत आणि राधिका शांततेत एकत्र वेळ घालवू शकतात.
ब्रिटिश व्हर्जिन आयलंड – नवविवाहित जोडप्यांसाठी हे खूप रोमँटिक ठिकाण आहे. येथील सुंदर बीचवर जोडपी चांगला वेल घालवू शकतात. नवविवाहित अनंत आणि राधिकाच्या हनिमून डेस्टिनेशनच्या यादीत हा पर्याय देखील असू शकतो.