Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?

| Updated on: Jul 12, 2024 | 3:25 PM

Anant-Radhika wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत. मुंबईत 40 दिवसांचा भंडारा हे सुद्धा त्यापैकीच एक आहे.

Anant-Radhika wedding : अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने मुंबईत 40 दिवसांचा भंडारा, रोज किती हजार लोक जेवतात?
Anant Radhika wedding
Follow us on

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच आज लग्न आहे. अनंत अंबानी राधिका मर्चेंट सोबत विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे हे लग्न होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून अंबानी कुटुंबात या लग्न सोहळ्याच सेलिब्रेशन सुरु आहे. विविध सेलिब्रिटी, बॉलिवूड कलाकार, नामवंत व्यक्ती या कार्यक्रमांमध्ये सहभाही झाल्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्नाच्या निमित्ताने एक भव्य-दिव्य सोहळा, अंबानी कुटुंबाची श्रीमंती दिसतेय. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला सेवा भावनेतून अनेक चांगले सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आलेत.

अंबानी कुटुंबाची परोपकार, सेवा भावनेतून अनेक कार्य सुरु असतात. अनंत-राधिकाच्या लग्नाआधी 50 जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्त्रीधन म्हणून अनंत यांची आई नीता अंबानी यांनी वधूंना 1 लाख रुपये आणि दागिने दिले. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दररोज किती हजार लोक जेवायचे?

लग्नाच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी मुंबईत 40 दिवस भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यामुळे दररोज 9000 लोकांची जेवणाची व्यवस्था झाली. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून भंडाऱ्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. म्हणजे हा भंडारा 5 जूनला सुरु झाला. सर्वांसाठी हा भंडारा खुला होता. दररोज दोनवेळ तीन ते चार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले

इथे जेवायला येणाऱ्या लोकांनी अनंत अंबानी यांना लग्नासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले,असं या भंडाऱ्याच्या सुपरवायजरने सांगितलं. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण अनंत अंबानी यांचं भरभरुन कौतुक करतायत. व्हेज पुलाव, ढोकळा, पुरी, पनीर, रायता असे पदार्थ जेवणामध्ये आहेत.