मासिक पाळीत 5 दिवस घरापासून दूर राहते ही अभिनेत्री; एकाही वस्तूला करत नाही स्पर्श, कोण आहे ही अभिनेत्री माहितीये?
अशी एक अभिनेत्री आहे जिने मासिक पाळीच्या दिवसांबद्दल काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. जसं तिने सांगितलं आहे की मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ही अभिनेत्री घरापासून दूर राहते आणि घरात असेलच तर घरातील एकाही वस्तूला स्पर्श करत नाही. पण ती असं का करते? याचा खुलासा तिने केला आहे, सध्या तिने केलेलं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

फिल्म इंडस्ट्रीत काम करताना अभिनेता असो किंवा अभिनेत्री दोघांनाही सारखीच मेहनत घ्यावी लागते. त्यामध्ये मासिक पाळी हा मुद्दा देखील समोर येतो. पण शक्यतो काम करत असताना अभिनेत्री मासिक पाळीत काम करण्याचा प्रयत्न करतात. पण याला एक अभिनेत्री नक्कीच अपवाद आहे. ही अभिनेत्री मासिक पाळीमध्ये अजिबात काम करत नाही. फक्त कामच नाही तर ती घरापासूनही दूर राहते. तसेच घरातील वस्तूंना स्पर्शही करत नाही.
तेलुगू इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री
ही अभिनेत्री आहे 39 वर्षीय अनसूया भारद्वाज. ही तेलुगू इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सुपरहिट तेलुगू शोमध्ये त्याच्या जबरदस्त अभिनयाने तिने खूप प्रसिद्धी मिळवली. इतक्या उंचीवर पोहोचण्यासाठी तिला शून्यापासून सुरुवात करावी लागली. अनसूया ही अशा स्टार्सपैकी आहे जे स्पष्टपणे बोलतात. अनसूया देखील तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अशाच एका मुलाखतीत तिने तिच्या मासिक पाळीच्या दिवसांबद्दल काही खुलासे केले जे नक्कीच काहींना पटणारे तर काहींना न पटणारे आहेत.
View this post on Instagram
मासिक पाळीदरम्यान घरापासून राहते दूर
मुलाखतीत तिने तिची वैयक्तिक आयुष्य कसं आहे? चित्रपटांमध्ये दिसणारी आणि घरात राहणारी अनसूया नेमकी कशी आहे. तसेच तिने तिच्या खाण्याच्या सवयी, फिटनेसचे रहस्य आणि मासिक पाळी दरम्यान ती कशी राहते याबद्दल उघडपणे सांगितले.तिने सांगितले की तिच्या घरात लहानपणापासून एक परंपरा होती, जी ती आजही पाळते. मासिक पाळीच्या काळात ती पाच दिवस घरापासून दूर राहते.
मासिक पाळीच्या काळात घरातील कोणत्याही वस्तूंना हात लावत नाही
आणि जर घरात असेलच तर ती तिच्या मासिक पाळीच्या काळात घरातील कोणत्याही वस्तूंना हात लावत नाही. ती म्हणाला की तिची सासूही तिला याबाबत कधीही विचारत नाही. अनसूया म्हणाली की, काही पुरुष मासिक पाळीच्या काळात महिलांना न समजून त्यांच्याशी वाईट वागतात, जे चुकीचे आहे. घराची लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या महिलांची आपल्या जीवनात उपस्थिती हा एक आशीर्वाद आहे.” मुलाखतीतील तिची वक्तव्य आता चांगलीच व्हायरल होत आहे.
नवीन चित्रपटांच्या ऑफर्स
छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अनसूयाने तिचे टॅलेन्ट दाखवले आणि आपली ओळख निर्माण केली आहे. अनसूया आता मोठ्या पडद्यावरही तिचं टॅलेन्ट दाखवत आहे. तिला मोठ मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येत असल्याचंही तिने म्हटलं आहे. काही दिवसांतच, पवन कल्याणच्या ‘हरिहर वीरमल्लू’ या चित्रपटात अनसूया दिसून येईल. या चित्रपटातील ‘कोल्लागोट्टीनादिरो’ या गाण्यात तिने पवनसोबत डान्सही केला आहे. यासाठी तिने मोठं मानधन आकारलं आहे. तर दुसरीकडे, अनसूयाचे सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स सतत वाढवताना दिसत आहे.