Abhishek Bachchan : बसं झालं आता… कॅमेरा पाहून ज्युनिअर बच्चन चिडला, हात जोडून म्हणाला…
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लाडक्या लेकाचा अभिषेकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यात तो बराच चिडलेला दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं पर्सनल आयुष्य सध्या फारच चर्चेत आहे. एकीकडे त्याच्या आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत फिरत आहे तर दुसरीकडे त्याचं नाव अभिनेत्री निमरत कौरशीही जोडलं जात आहे. याचदरम्यान पापराठी आणि कॅमेरा समोर दिसताच अभिषेक चिडला आणि ते पाहून युजर्सनी त्याला पुन्हा ट्रोल केलंय.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लाडक्या लेकाचा अभिषेकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुंबई एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ आहे. काही काळापूर्वी अभिषेक हा त्याच्या अपकमिंग ‘हाउसफुल 5’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून मुंबईत परतला तेव्हाच पापाराझींनी त्याला स्पॉट केलं आणि त्याचे फोटो, व्हिडीओ काढू लागले. मात्र अभिषेकला काही हे आवडलं नाही आणि तो थेट पापाराझींवरच चिडला.
काय म्हणाला अभिषेक बच्चन ?
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अभिषेकने पापाराझींसमोर थेट हातच जोडले. व्हिडीओच्या सुरूवातील अभिषेक पापाराझींना काहीच बोलला नाही, पण ज्या क्षणी ते कॅमेरा घेऊन त्याच्या जवळ आले, ते पाहून अभिषेक चिडला. त्याने थेट त्यांच्यासमोर हात जडोले आणि म्हणाला “बस भाई, झालं ना आता, धन्यवाद।” ते ऐकताच पापाराझींनीही कॅमेरे खाली करत त्याला जाऊ दिलं .
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
मात्र अभिषेकचा हा व्हिडिओ पाहून लोक त्याला बरंच ट्रोल करत आहेत. इतर सेलिब्रिटी पापाराझींकडे पाहून हसतात किंवा हाय तरी करतात, पण हे तर उलटं आहे, हा तर चिडलाच की, असं एकाने लिहीलं . तर दिसऱ्याने त्याचे थेट संस्कारच काढले, अभिषेकवर आईचे (जया बच्चन) संस्कार झालेले दिसतात. हाच याच्या अध:पतनाला कारणीभूत आहे, अशी कमेंट एकाने केली तर हा तर ‘जया बच्चन पार्ट 2’ असंही एकाने लिहीलंय.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या चर्चा कित्येक महिन्यांपासून फिरत आहेत. अंबानींच्या लग्न सोहळ्यातही संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र एंट्री केली मात्र सूनबाई ऐश्वर्या आणि नात आराध्या त्यांच्यासोबत नव्हत्या. त्या दोघींनी नंतर वेगळी एंट्री केली. दसवी चित्रपटादरम्यान अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निमरत कौर यांची जवळीक वाढल्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या संसारात आग लागल्याचे बोलले जात आहे. अनेक युजर्सनी अभिषेकसह बच्चन कुटुंबावर अनेकदा टीकास्त्रही सोडलं आहे. मात्र याप्रकरणी अभिषेक किंवा ऐश्वर्या दोघांपैकी कोणीच मौन सोडलेले नाही, पण ते दोघेआता एक्तर रहात नसून ऐश्वर्या ही आराध्या आणि तिच्या आईसोबत रहात असल्याचेही वृत्त आहे.
वर्कफ्रंट
अभिषेकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘हाऊसफुल 5’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो शाहरुख खानसोबत त्याच्या ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो शुजित सरकारसोबत एका नवीन चित्रपटातही काम करत आहे.