Rakhi Sawant | ‘टच मत करो शर्म करो…’, दुबईवरून परतल्यावर कोणावर भडकली राखी सावंत ?
राखी सावंत आणि वाद हे काही नव समीकरण नाही. दरवेळेस नवनव्या मुद्यांवरून चर्चेत कसं रहायचं हे तिला चांगलंच माहीत आहे. सध्या राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून ती त्यात चांगलीच भडकलेली दिसत आहे.

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि वाद हे जुनं समीकरण आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सतत लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच राखी ही पहिला उमराह करून भारतात परतली आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट देखील तेथील फोटो आणि व्हिडीओ यामुळे भरलेले आहे. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न (Marriage) केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला. एवढेच नव्हे तर तिने तिचं नाव राखी नव्हे तर फातिमा असल्याचं देखील जाहीर केलं. आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ती चांगलीच भडकलेली दिसत आहे.
खरंतर या व्हिडीओमध्ये राखीचा अंदाज पूर्णपणे बदललेला दिसत आहे. उमराहसाठी राखीने भारत सोडला अन् तिचा पोशाख पूर्णपणे बदलला. राखी उर्फ फातिमा ही आता पूर्णपणे मुस्लिम धर्माचे पालन करताना दिसत आहे. तिचा केवळ पेहरावच नव्हे तर बोलण्याची पद्धतही बदलली आहे. या नव्या व्हिडीओमध्ये राखी ही लाल रंगाच्या बुरख्यात दिसत असून ती आजूबाजूच्या पुरुषांना सल्लेही देताना दिसली.
‘पुरूषांनो माझ्यापासून थोडं दूर रहा, मला हे सगळं आवडतं नाही’ असं राखी यात म्हणताना दिसली. पण महिलांशी ती अतिशय प्रेमाने वागताना दिसली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये राखी लोकांना उत्तर देता देताच पुरूषांवर भडकलेली दिसली. ती म्हणाली, ‘ पुरूषांनी , मला हात लावू नका. जरा तरी लाज बाळगा. दूर रहा माझ्यापासून’ अशा शब्दांत तिने आजूबाजूच्या लोकांना फटकारलं. या व्हिडीओमध्ये राखीचा बदललेला अंदाज स्पष्टपणे दिसत आहे.तिचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यात अनेक वाद झाले. त्यांनी एकमेकांवर बरेच आरोपही केले आहेत. त्यानंतर राखीच्या आरोपांमुळे आदिल दुर्रानी तुरूंगात गेला. मात्र बाहेर आल्यावर त्याने तिच्यावरच पलटवार करत तिची पोलखोल केली.