अनुराग कश्यप-अनिल कपूर यांच्यात ट्विटर वॉर, जाणून घ्या काय आहे कारण…?

अनिल कपूर-अनुराग कश्यपमध्ये ट्विटरवर सुरु असलेलं वॉर हा प्रमोशनचा एक भाग असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

अनुराग कश्यप-अनिल कपूर यांच्यात ट्विटर वॉर, जाणून घ्या काय आहे कारण...?
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 12:00 AM

मुंबई :  अभिनेता अनिल कपूर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपमध्ये ट्विटर वॉर रंगलं आहे. ट्विटच्या माध्यमातून दोघांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले केले आहेत. अनुराग आणि अनिलमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळणार आहे. ट्विटरवर सुरु असलेलं वॉर हा प्रमोशनचा एक भाग असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. (Anil Kapoor Vs Anurag kashyap tweeter War Wiral tweet)

‘दिल धडकने दो’ मधील आपली सहकारी शेफालीचं कौतुक करणारं ट्विट अनिल कपूरने केलं. अनिल कपूरच्या याच ट्विटला रिट्विट करत अनुराग कश्यपने अनिलवर निशाणा साधला. यानंतर अनिल कपूरनेही अनुरागला उत्तर देताना कुठलीही कसर ठेवली नाही.

दिल्ली क्राइम सीरिजच्या टीमचे कौतुक करत अनिल कपूर यांनी एक ट्विट केलं. तुम्ही डिझर्व्ह करता, चांगलं वाटतं जेव्हा लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळते. याच ट्विटला रिट्विट करत अनुराग कश्यपने म्हटलं, मलाही चांगलं वाटतं जेव्हा काही चांगल्या लोकांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होतं. बाय द वे, आपला ऑस्कर कुठे आहे, ओ सॉरी नामांकन, असं ट्विट करत अनुरागने अनिल कपूरवर निशाणा साधला.

अनुरागने ऑस्करवर केलेली तिरकस कमेंट अनिल कपूरला आवडली नाही. “तुम्ही तर ऑस्करच्या जवळ तेव्हा आला होतात जेव्हा आपण टीव्हीवर Slumdog Millionaire ला ऑस्कर जिंकताना पाहिलं. जाऊ द्या… तुम्हाला नाही जमणार”, असं जोरदार प्रत्युत्तर अनिल कपूरने दिलं.

अनुराग-अनिल कपूरचं हे ट्विटर वॉर इथेही थांबलं नाही. यापुढेही अनुरागने अनिल कपूरला डिवचलं. तुम्ही तर Slumdog Millionaire साठी सेकंड चॉईस होतात ना? शाहरुख खानला कास्ट करण्याची तयारी होती. त्यावर अनिल कपूरने अनुरागला सुनावलं. राहू द्या तुमच्याप्रमाणे मला काम शोधायला लागत नाही. तसंच केसही वाकडे करावे लागत नाही, असं अनिल कपूर म्हणाला.

अनिल कपूरच्या या ट्विटनंतर अनुरागने नवं ट्विट करताना म्हटलं, “सर आपण केसांच्या बाबतीत तर बोलूच नका. तुम्हाला तर तुमच्या केसांच्या बळावरच फिल्म्समध्ये काम मिळतं. ट्विटर वॉर संपवताना अनिल कपूरने लिहिलंय, मी यामुळे खूप दु:खी आहे की तुमच्याबरोबर एक फिल्म करण्याचा निर्णय घेतला पण चिंता करु नका. शेवटी मीच हसणार आहे.

दुसरीकडे अनिल कपूर आणि अनुराग कश्यपची नेटफ्लिक्सवर Ak Vs Ak रिलीज होणार आहे. यामध्ये अनुराग आणि अनिलमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळणार आहे. ट्विटरवर सुरु असलेलं वॉर हा प्रमोशनचा एक भाग असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. (Anil Kapoor Vs Anurag kashyap tweeter War Wiral tweet)

संबंधित बातम्या

TV to Film Struggle : तू एक उत्कृष्ट अभिनेत्री, अनुराग कश्यपकडून अशनूर कौरचे कौतुक

Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.