Ankita Lokhande : सोशल मीडियावर अंकिता लोखंडेचे विंटर व्हेकेशन फोटो, सुशांतचे चाहते करणार पुन्हा ट्रोल ?
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Ankita Lokhande's romantic photos with boyfriend Vicky Jain)
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. आता सध्या तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain)सोबत धमाल करताना दिसत आहे. या फोटोमध्ये अंकिता आणि विकी बर्फात आनंद घेताना दिसत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की हे कपल डोंगरातील बर्फाचा आनंद घेतय. (Ankita Lokhande’s romantic photos with boyfriend Vicky Jain)
View this post on Instagram
या फोटोंमध्ये हे कपल खूप आनंदी दिसत आहे. हे फोटो शेअर करत अंकितानं ‘पुन्हा जायचं ? ‘ अंकिता आणि विकीचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. अनेक कलाकारांनी देखिल या फोटोंवर कमेंट केली आहे. एकीकडे अंकिताचे हे फोटो तिच्या चाहत्यांना पसंत येत आहेत तर दुसरीकडे अभिनेता सुशांतचे चाहते हे फोटो बगून नाराज होऊ शकतात.
यापुर्वी देखिल अंकिता झाली ट्रोल अंकिता आाणि सुशांतनं ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळजवळ 6 वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकितानं त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते.
मात्र सध्या सुशांतचे चाहते अंकिताला चांगलेच ट्रोल करत आहेत. दिवाळीला अंकितानं विकीसोबत रोमँटिक फोटो शेअर केले होते. त्यावेळीसुद्धा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये अंकिताला खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.