‘अनुपमा’मध्ये काम करण्यापूर्वी रूपाली गांगुलीने घेतलेला तब्बल 7 वर्षांचा ब्रेक, कारण सांगताना म्हणाली…

अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेमध्ये झळकते आहे. या मलिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असून, बरेच रेकॉर्ड्सही केले आहेत. बर्‍याच काळासाठी अनुपमाने टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले होते.

‘अनुपमा’मध्ये काम करण्यापूर्वी रूपाली गांगुलीने घेतलेला तब्बल 7 वर्षांचा ब्रेक, कारण सांगताना म्हणाली...
अनुपमा
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 2:06 PM

मुंबई : अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) सध्या ‘अनुपमा’ (Anupamaa) या मालिकेमध्ये झळकते आहे. या मलिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली असून, बरेच रेकॉर्ड्सही केले आहेत. बर्‍याच काळासाठी अनुपमाने टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले होते. मालिकेतील एका आईच्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली ‘अनुपमा’च्या भूमिकेत दिसते आहे. या शोने तिला एक खास ओळख मिळवून दिली आहे. पण हा शो करण्यापूर्वी रुपालीने कामापासून बराच मोठा ब्रेक घेतला होता (Anupamaa fame Actress Rupali Ganguly share why she takes 7 years break from career).

रूपाली गांगुलीने तिच्या अभिनय कारकीर्दीत ‘संजीवनी’, ‘परवरीश’, ‘साराभाई VS साराभाई’ अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. पण काही काळ ती छोट्या पडद्यावरून गायब झाली होती. रुपालीने मनोरंजन विश्वातून 7 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. ज्याबद्दल कारण आता तिने स्वतः सांगितले आहे.

यामुळे घेतला मोठा ब्रेक

रूपालीने नुकत्याच तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने या मालिकेत अभिनय करण्यापूर्वी तब्बल 7 वर्षांचा मोठा ब्रेक का घेतला होता. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘मी स्वतःसाठीच असा लांब ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. याचे कारण असे नाही की, मला काम मिळत नव्हते, म्हणून मी घरी बसण्याचा विचार केला.’ ती म्हणाली, ‘माझे स्वप्न होते की लग्न करावे आणि मला छोट बाळ असावं. आई बनताना मला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला, पण, जेव्हा मी आई बनले, तेव्हा मला आयुष्यापासून इतर कशाचीही अपेक्षा नव्हती.; रुपाली पुढे म्हणाली, ‘जर मला असा एक उत्कृष्ट शो ऑफर झाला नसता, तर हा 7 वर्षाचा ब्रेक आणखी बराच काळ चालला असतात.’(Anupamaa fame Actress Rupali Ganguly share why she takes 7 years break from career)

रुपालीला येतेय घराची आठवण

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे मुंबईत शूटिंग थांबवण्यात आले आहे. ज्यामुळे ‘अनुपमा’ या मालिकेचे शूटिंग सध्या गुजरातमध्ये सुरू आहे. सेटवरील सर्व कलाकार कुटुंबापासून दूर आपले काम सांभाळत आहेत. या दरम्यान ते आपल्या कुटुंबाला मिस करत आहेत. रुपालीही सेटवर आपल्या कुटुंबाच्या आठवणीने भावूक झाली होती. सूर्यास्ताबरोबर आपला फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘कहीं दूर जब दिन ढल जाए.. सांझ की किरणें. घर की बहुत याद सताए..’ या कॅप्शनसह रुपालीने ब्रोकन हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते.

पाहा रुपालीची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

(Anupamaa fame Actress Rupali Ganguly share why she takes 7 years break from career)

हेही वाचा :

PHOTO | सरोगेसीद्वारे झालेला किंग खानच्या लेकाचा जन्म, ‘या’ चित्रपटातही झळकलाय चिमुकला अबराम खान!

PHOTO | ‘कीस काँट्रोवर्सी’ विसरून पुन्हा घेतली एकमेकांची ‘गळाभेट’, राखी सावंत-मिका सिंगचे फोटो चर्चेत!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.