Arbaaz Khan Giorgia Andriani : दुसरं लग्न होऊनही पहिलीवर भडकला… अरबाज खान पुन्हा चर्चेत का?

अरबाज आणि शुराच्या लग्नापूर्वी जॉर्जिया हिने काही मुलाखती दिल्या, त्यामध्ये तिने तिच्या व अरबाजच्या ब्रेकअपबद्दल बरेचा खुलासे केले. अरबाजसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मी पूर्णपणे तुटले होते, असंही तिनं सांगितलं. माझ्यासाठी हा निर्णय सोप्पा नव्हता. या सगळ्या प्रकरणावर, जॉर्जियाने दिलेल्या मुलाखतींवर अरबाज खानने आत्तापर्यंत मौन राखलं होतं. मात्र आता त्याने त्याची चुप्पी तोडली असून जॉर्जियासोबतच्या ब्रेकअपबद्दल तो खुलेपणाने बोलला .

Arbaaz Khan Giorgia Andriani : दुसरं लग्न होऊनही पहिलीवर भडकला... अरबाज खान पुन्हा चर्चेत का?
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 5:46 PM

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : अभिनेता अरबाज खान याचं फिल्मी करिअर फारसं चाललं नाही. सलमान खानचा भाऊ म्हणूनच त्याची जास्त ओळख. मात्र काही वर्षांपूर्वी मलायका अरोरासोबत झालेला घटस्फोट आणि आता वयाच्या 50 शी नंतर शुरा खान हिच्याशी केलेलं दुसरं लग्न यामुळे तो बराच चर्चेत आला. त्याचे आणि शुराच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओही खूप व्हायरल झाले. त्यापूर्वी तो मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. मात्र त्यांचे ब्रेकअप झालं.

अरबाज आणि शुराच्या लग्नापूर्वी जॉर्जिया हिने काही मुलाखती दिल्या, त्यामध्ये तिने तिच्या व अरबाजच्या ब्रेकअपबद्दल बरेचा खुलासे केले. अरबाजसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे मी पूर्णपणे तुटले होते, असंही तिनं सांगितलं. माझ्यासाठी हा निर्णय सोप्पा नव्हता. या सगळ्या प्रकरणावर, जॉर्जियाने दिलेल्या मुलाखतींवर अरबाज खानने आत्तापर्यंत मौन राखलं होतं. मात्र आता त्याने त्याची चुप्पी तोडली असून जॉर्जियासोबतच्या ब्रेकअपबद्दल तो खुलेपणाने बोलला आहे. जॉर्जियाचं प्रेकअपबद्दल बोलणं त्याला फारसं रुचलेलं नाही असं दिसतंय.

अरबाजने सोडलं मौन

एका मुलाखतीत त्याने या सर्व मुद्यांवर भाष्य केले. ‘ माझ्या ( शुराशी) लग्नादरम्यान, जॉर्जियाने ब्रेकअपबद्दल जी मुलाखत दिली, जी वक्तव्य केली ते योग्य नव्हतं. (तिला) त्यावेळीच हे सगळं करणं गरजेचं नव्हतं. माझ्यात आणि जॉर्जियामध्ये सगळं काही आलबेल होतं, असं जे सांगितलं गेल, तसं काहीच (खरं) नव्हतं. माझी आणि शुराची भेट होण्यापूर्वीच आमचं ब्रेकअप झालं होतं’ असं अरबाजने स्पष्ट केलं.

‘ मी या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करतोय, याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. पण तिने इंटरव्ह्यूदरम्यान जे सगळं सांगितलं, की आमच्यात सगळं ठीक होतं, ते खोटं आहे. तिचं म्हणणं ऐकून लोकांना असं वाटलं असेल की मी एकीला सोडून दुसरीच्या मागे गेलो… पण हे खरं नाही. जॉर्जियाशी ब्रेकअप झाल्यानंतर दीड वर्ष मी कोणालाच डेट करत नव्हतो. त्यानंतर माझ्या आयुष्यात शुरा आली, हेच खरं आहे’ असं अरबाज खानने स्पष्ट केलं.

जॉर्जियावर साधला निशाणा

त्यापुढे अरबाजने जॉर्जियावरही निशाणा साधला. ‘ दोन वर्ष उलटून गेल्यानंतर आणि मी जेव्हा लग्न करत होतो, तेव्हाच ब्रेकअपबद्दल बोलणं, हे खूपच चुकीचं आहे. तिने खूप आधीच मूव्ह ऑन केलंय, हे मला माहीत आहे. पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देत असता, तेव्हा तुम्ही नक्की कधी वेगळे झालात त्याची, ब्रेकअपची योग्य टाइमलाइन द्यायला हवी होती. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असाल तर या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत ‘ अशा शब्दातं त्याने जॉर्जियाला सुनावलं. काही दिवसांपूर्वी तिने मुलाखतीत केलेली वक्तव्य, अरबाजला आवडली नाहीत, हेच यातून स्पष्ट होतंय.

मलायकासोबत घटस्फोट

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 1998 मध्ये विवाह झाला होता. पण मार्च 2016 मध्ये दोघे विभक्त झाले. मे 2017 मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. पण मुलासाठी दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यानंतर अरबाजने जॉर्जियाला डेट केलं, पण त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. त्यानंतर गेल्या वर्षी 24 डिसेंबरला अरबजाने शुरा खान हिच्याशी लग्न केलं. तर मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी अजूनही विवाह केला नसला तरी दोघे ही लवकरच विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....