बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय कपल ऐश्वर्या आणि सलमान यांचं होतं. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या असताना ऐश्वर्या आणि सलमान यांचं ब्रेकअप चाहत्यासाठी हैराण करणारं होतं. ब्रेकअपनंतर अनेकांनी सलमान खान याच्यावर दोष लावले. पण सत्य पूर्णपणे उलटं होतं… असं अभिनेता अरबाज खान याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय हिच्या वडिलांना देखील सलमान खान आवडत नव्हता. सलमान याच्यासोबत ऐश्वर्याचं काहीच भविष्य नाही… असं ऐश्वर्याच्या वडिलांना वाटत होतं. एवढंच नाही तर, हे वाद पोलिसांपर्यंत देखील पोहोचल्याचं अनेकदा समोर आलं. दरम्यान, अरबाज खान याने एका मुलाखतीत सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला.
अरबाज खान याने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या हिच्यामुळे सलमानच्या वागणुकीत बदल होऊ लागले होते. कधी – कधी सलमान खान इतक्या रागात असायचा की तोड – फोड देखील करु लागला होता. लग्नामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं देखील सलमान खान याने स्पष्ट केलं.
अरबाज खान म्हणाला, ‘ऐश्वर्या घरी यायची… कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायची. पण लग्नाचा विषय आला की टाळा-टाळ करायची… ज्यामुळे भाईजान त्रासलेला असायचा. सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचं होतं. पण तेव्हा ऐश्वर्या तयार नव्हती… ज्यामुळे सलमान सतत रागातच असायचा…’ असं देखील अरबाज खान म्हणाला होता.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचं नाव अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. पण विवेक सोबत देखील ऐश्वर्याचं नातं टिकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिषेकसोबत लग्न केलं.
2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने लेक आराध्या हिला जन्म दिला. आता ऐश्वर्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. अनेकदा अभिनेत्रीला आराध्या हिच्यासोबत स्पॉट केलं जातं. ऐश्वर्या आराध्यासोबत फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.