Arbaaz Khan : ब्रेकअपनंतर सलमान खानचा भाऊ पुन्हा पडला प्रेमात ? जॉर्जिया अँड्रियानी नंतर अरबाजच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री; कोण आहे ती ?
आधी मलयका अरोरासोबत घटस्फोट... नंतर जॉर्जिया अँड्रियानी हिच्यासोबतचे रिलेशन नंतर पुन्हा ब्रेकअप... कामापेक्षा पर्सनल आयुष्यामुळेच अरबाज खान चर्चेत असतो. आता त्याच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एंट्री.. कोण आहे अरबाजची गर्लफ्रेंड ? वाचा सविस्तर..
मुंबई | 21 डिसेंबर 2023 : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान त्याच्या चित्रपटांपेक्षा गेल्या काही काळात पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत आहे. आधी मलायका अरोरासोबत झालेला घटस्फोट, त्यानंतर जॉर्जिया अँड्रियानी हिच्यासोबतचे रिलेशन यामुळे अरबाजच्या पर्सनल आयुष्याबद्दल बरीच चर्चा झाली. अनेक वर्ष एकत्र असलेल्या अरबाज -जॉर्जियाचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली. चार वर्ष डेटिंग केल्यानंतर अचानक आलेल्या त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे त्या दोघांचेही चाहते खूप दुखावले. मात्र जॉर्जिया हिनेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला. दीड वर्षापूर्वीच आमचे मार्ग वेगळे झाले, असं तिने सांगितलं होतं.
मात्र आता अरबाजच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार अरबाज मनोरंजन क्षेत्रातीलच एका व्यक्तीला डेट करत आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जॉर्जियासोबत ब्रेकअप नंतर अरबाज पुन्हा पडला प्रेमात!
1998 साली अरबाज-मलायकाचं लग्न झालं, बॉलिवूडमधील ते एक आयडिअल कपल होतं. पण मार्च 2016 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय जाहीर केला. दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरला डेट करत आहे तर अरबाज हा जॉर्जिया अँड्रियानी हिच्यासोबत रिलेशनमध्ये होता. जवळपास चार वर्ष ते एकत्र होते, 2019 मध्ये अरबाजने त्यांच्या नात्याची कबुलीही दिली. मात्र गेल्या वर्षी त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा उठू लागल्या, पण ते दोघेही गप्प होते. अखेर काही दिवसांपूर्वीच जॉर्जियाने एका मुलाखतीमध्ये ब्रेकअपचा खुलासा केला. दीड वर्षांपूर्वी आम्ही दोघं वेगळे झालो, असं तिने स्पष्ट केलं.
अरबाजच्या आयुष्यात नव्या महिलेची एंट्री
आता अरबाजच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या महिलेची एंट्री झाल्याची चर्चा सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, अरबाज खान हा बॉलिवूडमधील मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिला डेट करत आहे. एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बरेच सीरिअस असून लवकरच लग्नबंधनात अडकण्याचाही त्यांचा प्लान आहे.
कोण आहे अरबाजची गर्लफ्रेंड, कुठे झाली भेट ?
अरबाज आणि शूरा या दोघांची पहिली भेट, अरबाजच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर झाल्याची माहिती आहे. पुढल्या वर्षी हा पिक्चर रिलीज होणार आहे. शूरा ही एक मेकअप आर्टिस्ट असून तिने बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची लेक राशा थडानी यांच्यासाठी काम केलं आहे. तिच्या इन्स्टा प्रोफाइलवर त्यांचे अनेक फोटो आहेत.