“फार बकवास ऐकायला लागत नाही….” मलायकासोबत ब्रेकअपनंतर अर्जुन कपूर पहिल्यांदाच व्यक्त झाला
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. पण ब्रेकअपनंतरही दोघांमध्ये अजूनही चांगली मैत्री आहे. नुकतंच अर्जुन कपूरने त्याच्या सिंगल राहण्याबद्दल आणि एकटे राहण्यावर भाष्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने मलायका अरोराला अनेक वर्षे डेट केलं. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. मात्र, आता दोघांमधील संबंध संपुष्टात आले आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे गेल्या वर्षीच ब्रेकअप झालं. ‘सिंघम अगेन’ च्या प्रमोशन दरम्यान अर्जुन कपूरने तो सिंगल असल्याचंही उघड केलं होतं. दरम्यान त्यांच्या ब्रेकअपबद्दल मलायका अरोरा बऱ्याचदा मुलाखतींमध्ये बोलली आहे पण अर्जुन कपूरने कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पण आता कार्यक्रमादरम्यान त्याने त्याच्या आणि मलायकाच्या ब्रेकअपनंतर त्याच्या एकटे राहण्याबद्दल सांगितले आहे.
सिंगल राहण्यावर भाष्य केलं
अर्जुन कपूरने नुकतंच शोशा रील अवॉर्ड्सचे आयोजन केलं होतं. यादरम्यान, त्याने गंमतीने सांगितलं की, एकटे राहणे इतके वाईट नाही. तो म्हणाला, ‘आज मी एकटा आहे. मला वाटतं एकटे राहणे आपल्या सर्वांसाठी इतकं वाईट नाहीये. हे आपल्या सर्वांसाठी फायदेशीर आहे. कारण होस्ट असो किंवा काही काम त्यातून कमावलेले पैसे मला एकट्यालाच मिळतात. आणि तुम्हाला कमी बकवास गोष्टी ऐकाव्या लागतात, म्हणजे कमी संभाषणं होतं कारण लोकांचा लक्ष अटेंशन टाइम कमी झाला आहे.” असं म्हणत त्याने हसत हसत का असेना पण सिंगल राहणं चांगल असल्याचं त्याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
8 वर्षांनी नातं तुटले
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी 2018 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. दोघेही एकत्र सुट्ट्या एन्जॉय करायचे. दोघांनीही सुमारे 8 वर्षे एकमेकांना डेट केले. त्या काळात, अनेक चाहत्यांना वाटलं की ते लग्न करतील. पण 2024 मध्ये त्यांच्या वेगळी होण्याची बातमी आली. अर्जुनने त्याच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितले की तो आता सिंगल आहे.
ब्रेकअपनंतरही अर्जुन आणि मलायका यांच्यात कमाल बॉन्डिंग
ब्रेकअपनंतरही अर्जुन आणि मलायका यांच्यातील नाते चांगलेच आहे. फेब्रुवारीमध्ये अर्जुन मलायकाच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता. तो रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरसोबत त्याच्या ‘मेरे हसबंड की बीवी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. शोमध्ये मलायकाचा डान्स परफॉर्मन्स पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला. जेव्हा त्याला मलायकाच्या डान्सचे कौतुकही केले होते.
‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये दिसणार अर्जुन कपूर
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अर्जुन कपूर नुकताच ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटात दिसला होता. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तेवढा कमाई करू शकला नाही. आता अर्जुन त्याचे वडील बोनी कपूर निर्मित ‘नो एंट्री’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.