मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरचा टॅटू चर्चेत; फोटो शेअर करत भावनिक पोस्ट
अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर एक नवीन टॅटू काढला आहे. हा टॅटू त्याने खांद्यावर गोंदवला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरचा टॅटू चर्चेत; फोटो शेअर करत भावनिक पोस्ट मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरचा टॅटू चर्चेत; फोटो शेअर करत भावनिक पोस्ट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/2-10-59.jpg?w=1280)
अर्जुन आणि मलायका अरोराचं ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघेही नक्कीच चर्चेत आहे. त्यात अर्जुन कपूर ‘‘सिंघम अगेन’च्या रिलीजनंतर तर अर्जुन कपूरची अजूनच चर्चा होत आहे. त्याने केलेल्या अभिनयाबद्दल सर्वांनीच त्याचे, कौतुक केले आहे. दरम्यान आता अर्जुनचा टॅटू चर्चेत आला आहे.
टॅटूची चर्चा
मलायकाबरोबरच्या ब्रेकअप नंतर अर्जुन हा टॅटू काढला असल्यामुळे त्याची बरीच चर्चा होत आहे. अर्जुनने हा टॅटू त्याची दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या स्मरणार्थ गोंदवून घेतला आहे. त्याने हा टॅटू आपल्या खांद्याच्या मागच्या बाजूला गोंदवला आहे. ‘रब राखा’ असा टॅटू त्याने गोंदवून घेतला आहे. त्याने याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
आईसाठी खास अन् भावनिक टॅटू
अर्जुनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर या टॅटूचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे, अर्जुनने सिंघम अगेन’च्या रिलीजच्या पूर्वसंध्येला हा टॅटू गोंदवला असून त्याचे फोटो शेअर करताना त्याने भावनिक पोस्टही लिहिली आहे.
अर्जुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “रब राखा – ईश्वर नेहमी तुमच्याबरोबर आहे. माझी आई चांगल्या आणि वाईट काळातसुद्धा हे वाक्य नेहमी म्हणायची. आजही मला वाटतं की, माझी आई माझ्याबरोबर आहे, ती माझ्यावर लक्ष ठेवून मला मार्गदर्शन करत आहे.” असं लिहित त्याने हा टॅटू आईला समर्पित केला आहे.
View this post on Instagram
अर्जुनने पुढे लिहिले आहे की, “‘सिंघम अगेन’च्या रिलीजच्या आधी मी हा टॅटू गोंदवला आहे. आता जेव्हा मी माझ्या आयुष्यातील नव्या टप्प्यावर आहे, तेव्हा मला वाटतं की माझ्या आईने मला पाठिंबा दिलाय आणि ती मला सांगत आहेत की, या युनिव्हर्सची माझ्यासाठी काहीतरी योजना आहे. आई, मला श्रद्धा शिकवल्याबद्दल धन्यवाद, रब राखा, नेहमीच.” असं म्हणत त्याने त्याच्या आयुष्यात त्याच्या आईचे असलेले महत्त्वाचे स्थानही दाखवून दिले आहे.अर्जुन कपूरच्या या टॅटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान अर्जुन कपूरचे ‘सिंघम अगेन’साठी सर्वजण कौतुक करत आहेत. सध्या तो टीमसोबत चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.