अर्जुन रामपालची NCB चौकशीला दांडी, कारण…
अर्जुन रामपालने एनसीबीकडे सहा दिवसांची वेळ मागत 22 तारखेला सकाळी 11 वाजता हजर राहण्याची ग्वाही दिली.
मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) एनसीबीसमोर चौकशीला हजर राहिला नाही. वैयक्तिक कारणास्तव अर्जुनने आणखी सहा दिवसांचा वेळ एनसीबीकडे मागितला आहे. ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज (16 डिसेंबर) अर्जुन रामपालला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आता अर्जुनने मुदतवाढ मागण्याच्या नेमक्या कारणांवर चर्चा रंगली आहे. (Arjun Rampal asked new date to NCB enquiry)
अर्जुन रामपालने एनसीबीकडे 21 डिसेंबरपर्यंत वेळ मागितली. 22 तारखेला सकाळी 11 वाजता हजर राहण्याची ग्वाही अर्जुनने एनसीबीला दिली. अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. ड्रग्ज प्रकारात मोडणाऱ्या या औषधावर भारतात बंदी आहे. याबाबत अर्जुनला स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अर्जुनने प्रिस्क्रिप्शन्स जमा केल्याचं सांगितलं होतं. मात्र एनसीबीचं समाधान झाल्याचं दिसत नाही.
अर्जुन रामपालची गर्लफ्रेण्ड गॅब्रिएला डेमेट्रियड्सची दोन वेळा चौकशी केली होती. काल तिचा भाऊ अॅगिसिलोस डेमेट्रियड्सची (Agisilaos Demetriades) सुटका झाली, परंतु त्याला देशाबाहेर जाता येणार नाही. एनसीबीने त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे.
एनसीबीने नुकतंच महाकाल नावाच्या बड्या ड्रग पेडलरला अटक केली होती. मुंबईतील अनेक ठिकाणी एनसीबीकडून छापेमारी सुरुच आहे. ड्रग पेडलरच्या चौकशीत अर्जुनचं नाव समोर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अर्जुनला एनसीबीने पुन्हा बोलावल्याची शक्यता आहे.
अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?
अर्जुन रामपालला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याचे कारण काय? याची चर्चा रंगली आहे. अर्जुनविरुद्ध एनसीबीला ठोस पुरावे सापडले आहेत का? चौकशीनंतर एनसीबी अर्जुनला अटक करु शकेल का? हे प्रश्न उद्भवले आहेत. कारण आतापर्यंत एनसीबीने बॉलिवूडमधील कुठल्याही बड्या कलाकाराला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले नाही. अशा परिस्थितीत अर्जुनला पुन्हा समन्स बजावल्याने एनसीबीच्या हाती काहीतरी लागल्याची शक्यता वर्तवली जाते.
अर्जुन रामपालला यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. 17 नोव्हेंबरला अर्जुनची सहा तास चौकशी झाली होती. त्यावेळी अर्जुन रामपालला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुनने एनसीबीच्या कार्यशैलीचं कौतुक करत ड्रग्ज प्रकरणाशी आपलं काही देणंघेणं नसल्याचं मीडियाला सांगितलं होतं. (Arjun Rampal asked new date to NCB enquiry)
अर्जुनच्या घरी बंदी असलेल्या गोळ्या
अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. ड्रग्ज प्रकारात मोडणाऱ्या या औषधावर भारतात बंदी आहे. याबाबत अर्जुनला स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अर्जुनने प्रिस्क्रिप्शन्स जमा केल्याचं सांगितलं होतं.
अर्जुन रामपालची कोणत्या मुद्द्यांवर चौकशी?
- अॅगिसिलोस डेमेट्रियड्स याच्या बाबत चौकशी झाली होती. अॅगिसिलोस हा अर्जुन रामपाल याचा मेहुणा आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता.
- अर्जुन रामपाल याच्या घरी बंदी घातलेलं औषध सापडलं होतं.
- एनसीबी अधिकाऱ्यांनी पॉल बारटेल याला अटक केली आहे. पॉल हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून तो अर्जुन रामपाल याचा मित्र आहे. पॉल याचे ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. पॉल याच्या आंतरराष्ट्रीय माफिया सोबत असलेल्या संबंधा बाबत रामपाल यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
मेहुणा अॅगिसिलोस डेमेट्रियड्सची सुटका, अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स
सात तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!
(Arjun Rampal asked new date to NCB enquiry)