Arjun Rampal | अवघ्या 5 दिवसांत कोरोनावर मात, अर्जुन रामपालने चाहत्यांना सांगितले लवकर बरे होण्याचे रहस्य!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने 5 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट केली होती. अर्जुनने म्हटले होते की, त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु जेव्हा त्याची चाचणी घेण्यात आली तेव्हा हा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.

Arjun Rampal | अवघ्या 5 दिवसांत कोरोनावर मात, अर्जुन रामपालने चाहत्यांना सांगितले लवकर बरे होण्याचे रहस्य!
अर्जुन रामपाल
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 10:22 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याने 5 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट केली होती. अर्जुनने म्हटले होते की, त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु जेव्हा त्याची चाचणी घेण्यात आली तेव्हा हा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच आता अर्जुनने सांगितले की, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे (Arjun Rampal share corona recovery experience with fans).

अर्जुनने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलही माहिती दिली आणि त्याबरोबर आपण यातून कसे बरे झालो हे देखील सांगितले आहे. अर्जुनने आपला फोटो शेअर करत लिहिले की, ‘ज्यांना या काळात आरोग्याच्या अडचणी येत आहेत, अशा सर्वांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. मी भाग्यवान आहे की माझ्या 2 चाचण्या झाल्या आणि दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. देव माझ्यावर कृपा आहे.’

अर्जुन पुढे म्हणाला, ‘डॉक्टरांनी मला लवकर बरे होण्याचे कारण सांगितले आहे, त्यामागील एक कारण म्हणजे मी कोरोना लसीचा डोस घेतला होता, ज्यामुळे विषाणूचा माझ्या शरीरावर फारसा परिणाम करू शकला नाही. म्हणून, मी सर्वांना सांगेन की आपण लवकरात लवकर लस घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनां बद्दल धन्यवाद. पॉझिटिव्ह विचार करा, परंतु कोरोना पॉझिटिव्हचा नाही. हे सर्व लवकरच निघून जाईल.’

वाचा अर्जुन रामपालची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Arjun (@rampal72)

 (Arjun Rampal share corona recovery experience with fans)

‘धाकड’मध्ये दिसणार अर्जुन

अर्जुनच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘धाकड’ हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये कंगना एजंट अग्निच्या भूमिकेत झळकणार आहे. रजनीश रैजी घई दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 1 ऑक्टोबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

अर्जुनने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील आपल्या लूकचा एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याच्या रफ आणि टफ लुक चाहत्यांना खूप आवडला होता. पोस्टरमध्ये अर्जुन हातात बंदूक घेतलेला होता आणि त्याच्या गळ्यावर मोठा टॅटू होता. पोस्टर शेअर करताना अर्जुनने लिहिले, ‘बूम, वाईटचे दुसरे नाव रुद्रवीर आहे. जो विरोधी धोकादायक, प्राणघातक आणि त्याच वेळी कूल देखील आहे. ‘धाकड’ 1 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.’ या चित्रपटात अर्जुन एक नकारात्मक पात्र साकारत आहे. याआधीही अर्जुन, शाहरुख खानच्या ‘रा वन’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता, याला प्रेक्षकांनीही पसंती दिली होती.

(Arjun Rampal share corona recovery experience with fans)

हेही वाचा :

PHOTO | अविरत मनोरंजनाचा घेतलाय वसा, मालिकांच्या शूटिंगसाठी कलाकार निघाले गोवा-सिल्वासा!

‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.