अर्जुन रामपालची पुन्हा NCB चौकशी, अटकेची टांगती तलवार

ड्रग पेडलरच्या चौकशीत अर्जुनचं नाव समोर आल्याने एनसीबीने अर्जुनला पुन्हा बोलावल्याची शक्यता आहे.

अर्जुन रामपालची पुन्हा NCB चौकशी, अटकेची टांगती तलवार
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 9:09 AM

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याला पुन्हा एकदा एनसीबीने समन्स बजावलं आहे. ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी अर्जुन रामपालला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज (16 डिसेंबर) आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर अर्जुन रामपालचा मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सची (Agisilaos Demetriades) कालच तुरुंगातून सुटका झाली. त्यामुळे अर्जुनच्या चौकशीकडे बॉलिवूड वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Arjun Rampal summoned by NCB in Drug related case)

एनसीबीने नुकतंच महाकाल नावाच्या बड्या ड्रग पेडलरला अटक केली होती. मुंबईतील अनेक ठिकाणी एनसीबीकडून छापेमारी सुरुच आहे. ड्रग पेडलरच्या चौकशीत अर्जुनचं नाव समोर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अर्जुनला एनसीबीने पुन्हा बोलावल्याची शक्यता आहे.

अर्जुन रामपालवर अटकेची टांगती तलवार?

अर्जुन रामपालला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याचे कारण काय? याची चर्चा रंगली आहे. अर्जुनविरुद्ध एनसीबीला ठोस पुरावे सापडले आहेत का? चौकशीनंतर एनसीबी अर्जुनला अटक करु शकेल का? हे प्रश्न उद्भवले आहेत. कारण आतापर्यंत एनसीबीने बॉलिवूडमधील कुठल्याही बड्या कलाकाराला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले नाही. अशा परिस्थितीत अर्जुनला पुन्हा समन्स बजावल्याने एनसीबीच्या हाती काहीतरी लागल्याची शक्यता वर्तवली जाते.

अर्जुन रामपालला यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. 17 नोव्हेंबरला अर्जुनची सहा तास चौकशी झाली होती. त्यावेळी अर्जुन रामपालला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुनने एनसीबीच्या कार्यशैलीचं कौतुक करत ड्रग्ज प्रकरणाशी आपलं काही देणंघेणं नसल्याचं मीडियाला सांगितलं होतं.

अर्जुनच्या घरी बंदी असलेल्या गोळ्या

अर्जुनच्या घरी ट्रामाडॉल या औषधांच्या गोळ्या सापडल्या होत्या. ड्रग्ज प्रकारात मोडणाऱ्या या औषधावर भारतात बंदी आहे. याबाबत अर्जुनला स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अर्जुनने प्रिस्क्रिप्शन्स जमा केल्याचं सांगितलं होतं. (Arjun Rampal summoned by NCB in Drug related case)

अर्जुन रामपालची कोणत्या मुद्द्यांवर चौकशी?

  1. अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स याच्या बाबत चौकशी झाली होती. अ‍ॅगिसिलोस हा अर्जुन रामपाल याचा मेहुणा आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता.
  2. अर्जुन रामपाल याच्या घरी बंदी घातलेलं औषध सापडलं होतं.
  3. एनसीबी अधिकाऱ्यांनी पॉल बारटेल याला अटक केली आहे. पॉल हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असून तो अर्जुन रामपाल याचा मित्र आहे. पॉल याचे ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचं उघडकीस आलं आहे. पॉल याच्या आंतरराष्ट्रीय माफिया सोबत असलेल्या संबंधा बाबत रामपाल यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

मेहुणा अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सची सुटका, अर्जुन रामपालला एनसीबीकडून पुन्हा समन्स

सात तासांच्या चौकशीनंतर अर्जुन रामपालची सुटका, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया!

(Arjun Rampal summoned by NCB in Drug related case)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.