हा अभिनेता बसमध्ये विकायचा लिपस्टिक,नेलपॉलिश; जया बच्चन यांच्या एका फोननं आयुष्य बदललं
बॉलिवूडमधील एक असा अभिनेता ज्याने अत्यंत संघर्षाने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. पण त्याने बॉलिवूडमध्ये येण्याआधी चक्क बसमध्ये लिपस्टिक आणि नेलपॉलिश विकून त्याचं पोट भरलं आहे.आणि आज बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता असून सगळ्यात महागड्या घरात तो राहतो. हा अभिनेता कोण आहे ओळखलंत का?

बॉलुवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी स्वत:च्या हिंमतीवर आणि संघर्षाने आपलं एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. ज्यांनी अत्यंत कष्टाने आपलं नाव बॉलिवूडमध्ये उंचावलं आहे. अशाच एक अभिनेता आहे ज्याने वयाच्या 18 व्या वर्षापासून संघर्ष केला आहे. तेव्हाच डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवल्यावने त्याने पडेल ते आणि मिळेल ते काम करून स्वत:चं पोट भरलं.
तेव्हाच नाही तर या अभिनेत्याने बॉलिवूडमध्येही आपलं खास स्थान निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि जो इंडस्ट्रीतील नावारुपाला आलेला प्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता म्हणजे प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक अर्शद वारसी. अर्शदने त्याच्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की अभिनेता होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास संघर्ष आणि आव्हानांनी भरलेला आहे.
आई-वडिलांचं निधन, घर विकलं गेलं
अर्शद वारसीचे वडील अहमद अली खान हे कवी आणि गायक होते. तसेच त्यांनी सूफी संत वारीस पाक यांच्या सन्मानार्थ वारसी हे आडनाव धारण केले. जेव्हा अर्शद फक्त 18 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, त्याच्या आई किडनी फेल झाल्याने त्यांचही निधन झालं. आईवडिलांना गमावल्यानंतर अर्शद पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कायदेशीर अडचणींमुळे, त्याने ग्रँट रोडवरील त्याच्या मोठं घरही त्याला गमवावं लागलं. त्याला जुहू येथीलही त्याचा बंगला त्याला सोडावा लागला. कोणताही पर्याय नसल्याने, अर्शद आणि त्याचा भाऊ एखा छोट्याशा खोलीत राहत होते. त्यानंतरही त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला होता.
बसमध्ये लिपस्टिक आणि नेलपॉलिश विकल्या
दहावी पूर्ण केल्यानंतर, अर्शद वारसीला शाळा सोडून कामाला सुरुवात करावी लागली. त्याला पोट भरण्यासाठी तो लिपस्टिक आणि नेलपॉलिश विकायचा.एका रिपोर्टनुसार अर्शद बोरिवली आणि वांद्रे दरम्यानच्या बसमध्ये लिपस्टिक आणि नेलपॉलिश विकत असे. त्याने फोटो लॅबमध्येही काम केलं आहे. नंतर महेश भट्ट यांच्या ‘काश आणि ठिकाना’ या चित्रपटामध्ये त्याला सहाय्यक म्हणून काम मिळालं होतं.
जया बच्चन यांचा एक फोन आणि त्याचे आयुष्यच बदलले
अर्शद वारसीला नृत्याची खूप आवड होती. यामुळे तो अकबर सामीच्या नृत्य गटात सामील झाला. जिथे तो शेवटी कोरिओग्राफर बनला. त्याने एलीक पदमसी आणि भरत दाभोलकर यांच्यासोबत म्यूजिकवर काम केलं. जॉय ऑगस्टाइनकडून त्याला चित्रपटाची ऑफर मिळाली असली तरी तो कोरिओग्राफर म्हणून आनंदी होता कारण त्याला त्याच्या अभिनयाबद्दल एवढी खात्री नव्हती. तथापि,एकदा जया बच्चन यांनी अर्शदला चित्रपटात काम करण्यासाठी जेव्हा तयार केलं तेव्हा त्याचं आयुष्यच बदललं. त्यानंतर अर्शदने ‘तेरे मेरे सपने’मध्ये पहिली भूमिका केली आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
View this post on Instagram
मुन्नाभाईमधील त्याची सर्किटची भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली
अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून अर्शद वारसी चाहत्यांचा आवडता अभिनेता बनला. त्यांच्या अभिनयाने देशभरातील लोकांची मने जिंकली. गोलमालमधील मानव आणि धमालमधील आदित्य श्रीवास्तव या त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना प्रभावित केलं.खरं ओळख त्याला मिळाली ती ‘मुन्नाभाई’ या चित्रपटामुळे. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेली ‘सर्किट’ची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.