Aryan Khan : आर्यन खानची इंस्टाग्रामवर वापसी; भावंडांसोबत फोटो शेअर केला, शाहरुखची मजेशीर कमेंट
Aryan Khan आर्यन खानने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खूप दिवसांनी आर्यन खानची इंस्टाग्रामवर वापसी झाली आहे. आर्यन खानने आपल्या बहीण-भावासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
बॉलीवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा कायमच सोशल मीडियापासून दूर रहातो. तो क्विंचितप्रसंगीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा सर्वात पॉपुलर स्टार किड आहे. मात्र तरी देखील त्यांने स्वत:ला समाजमाध्यमांपासून दूर ठेवले आहे. तो काही खास प्रसंगीच सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत असतो. मात्र आता तो क्षण आला आहे. आर्यन खानने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खूप दिवसांनी आर्यन खानची इंस्टाग्रामवर वापसी झाली आहे. आर्यन खानने आपल्या बहीण-भावासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आर्यन खान सोबत बहीण सुहाना खान आणि भाऊ अबराम खान दिसत आहेत.
अबरामची क्यूट स्माईल
खूप दिवसांनी आर्यन खान याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आर्यन खान आपला भाऊ अबराम खान आणि बहीण सुहाना खान यांच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये आर्यन खान आपली बहीण सुहाना खान आणि भाऊ अबराम खान यांची गळाभेट घेतला दिसत आहेत. या फोटोत मुस्कान आणि अबराम यांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसून येत आहे.फोटोमध्ये आर्यन खानने ऑलिव्ह ग्रीन कलरचा टी-शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली आहे. त्यावर जॅकेट देखील परिधान केले आहे. तर सुहाना डेनिम लूकमध्ये दिसून येत आहे.आर्यन खानने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अबराम खान आणि आर्यन खान सोबत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोमध्ये आर्यन खान स्मार्ट दिसत आहे. या फोटोमध्ये अबराम खानने क्यूट स्माईल दिली आहे.
सुहाना -शाहरुखची कमेंट
या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. सुहाना खानने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. सुहानाने आपल्या एक कमेंटमध्ये लव्ह यू लिहून हर्टची इमोजी शेअर केली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुहाना दिसत नसल्याने तिने आपल्या मोठ्या भावाला म्हटलं आहे की, मला क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद. दुसरीकडे शाहरुख खानने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. त्यांने कमेंटमध्ये म्हटलं आहे की हा फोटो माझ्याकडे का नाही? हा फोटो मला पाहिजे.