Sa Re Ga Ma Pa L’il Champs | भाषेच्या अडचणींवर मात करत, केरळची आर्यनंदा ‘सारेगमप’ची विजेती!
हिंदी भाषा येत नसतानाही, तिने सगळ्या अडथळ्यांवर मात करत, विजेत्यापदाचा बहुमान पटकावला आहे.
मुंबई : ‘सारेगमप’च्या या 8व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. तब्बल 9 महिने सुरू असलेल्या या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. केरळची आर्यनंदा (Aryananda Babu) ‘सारेगमप’च्या या ‘लिटील चॅम्प्स’ पर्वाची विजेती ठरली आहे. हिंदी भाषा येत नसतानाही, तिने सगळ्या अडथळ्यांवर मात करत, विजेत्यापदाचा बहुमान पटकावला आहे. (Aryananda Babu winner Saregamapa little champs season 8)
These amazing little divas will spark musical magic at the #SRGMPLilChamps‘ Grand Finale. Don’t miss this blockbuster evening, on Sunday 11th October at 8:30 PM, only on #ZeeTVME@thealkayagnik @javedali4u @HimeshOnline @ManishPaul03 pic.twitter.com/AUIRwjLsA9
— zeetvme (@ZeeTVME) October 9, 2020
इतर स्पर्धकांना तगडी टक्कर देत, आर्यनंदा बाबूने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ची ट्रॉफी पटकावली आहे. ट्रॉफीसमवेत आर्यनंदा बाबूला (Aryananda Babu) बक्षीस म्हणून 5 लाख रुपयेही मिळाले आहेत. ‘सध्या आम्ही भाड्याच्या घरात राहतो. या शोमध्ये जिंकलेल्या पैशांतून आम्ही घर घेऊ आणि मी माझ्या अभ्यासासाठी काही पैसे ठेवणार आहे’, असे आर्यनंदाने म्हटले आहे.
‘सारेगमप’ तामिळची उपविजेती
आर्यनंदाला जगप्रसिद्ध गायक बनायचे आहे. आर्यनंदाचे आई-वडील कोचीतील मुलांना दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत शिकवतात. याआधी 2018मध्ये आर्यानंदा ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ तामिळच्या पर्वात उपविजेती ठरली होती. विशेष म्हणजे म्हणजे सातव्या इयत्तेत शिकणार्या आर्यनंदाला (Aryananda Babu) हिंदी बोलता, वाचता येत नाही. शोमध्येही हिंदी गाणी तिच्यासाठी खास मल्याळम भाषेत लिहिली गेली होती. (Aryananda Babu winner Saregamapa little champs season 8)
रनिता बॅनर्जी या शोची उपविजेती ठरली आहे. ट्रॉफीसह रनिताला तीन लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. त्याचवेळी सेकंड रनर अप गुरकीरतसिंह याला दोन लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. ‘सरेगमप लिटिल चॅम्प्स’च्या महाअंतिम सोहळ्याला जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, गोविंदा आणि सुनीता आहूजा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती.
Jackie Shroff will mesmerize everyone with his tune of love at the Blockbuster #GrandFinale of #SRGMPLilChamps, tonight at 8:30 PM, only on #ZeeTVME @thealkayagnik @javedali4u @HimeshOnline @ManishPaul03 pic.twitter.com/wwxB56QRia
— zeetvme (@ZeeTVME) October 11, 2020
अंतिम फेरीत जज अलका याज्ञिक, जावेद अली आणि हिमेश रेशमियाही मजामस्तीच्या मूडमध्ये दिसले होते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर जॅकी श्रॉफ यांनी ‘हिरो’ चित्रपटातील बासरी वादनाचे दृश्य रिक्रीएट केले होते. अभिनेता शक्ती कपूरही गोविंदासमवेत ‘सरेगमप लिटिल चॅम्प्स’च्या महाअंतिम सोहळ्यात गाणे गायले. (Aryananda Babu winner Saregamapa little champs season 8)
Raja Babu aka Govinda and Nandu aka Shakti Kapoor are all set to rock the stage with their iconic dance. Don’t miss all the fun in the #GrandFinale of #SRGMPLilChamps tomorrow at 8:30 PM, only on #ZeeTVME#Govinda @bindasbhidu #ShaktiKapoor pic.twitter.com/WhhrLERwnH
— zeetvme (@ZeeTVME) October 10, 2020