Salman Khan : सलमान खान याने टॅक्सीवाल्यासोबत केलेलं ‘ते’ कृत्य अखेर जगाच्या समोर आलं!
बॉलिवुडचा भाईजान सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमानने शिकार केल्यानंतर त्याच्यावर कोर्टात केस चालू होती मात्र काही दिवसांमागे त्याला निर्दोष म्हणून मुक्तता दिली होती. अशातच आता एक खुलासा झाला असून टॅक्सीवाल्यासोबत त्याने केलं होतं वाचा.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटाचा ट्रेलर इतका आवडला आहे की परदेशातील प्रेक्षकांनी या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे. तसंच सध्या सलमान खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकतंच सलमान खानने ‘किसी का भाई किसी की जान’च्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सलमानने एक किस्सा शेअर केला आहे. त्यानं सांगितलं की, त्याला एकदा बाहेर जायचं होतं त्यावेळी त्याने एक टॅक्सी बुक केली होती. पण त्याच्याकडे टॅक्सीवाल्याला द्यायला पैसे नव्हते. त्यानंतर सलमान टॅक्सीवाल्याला फसवून पळून गेला होता.
पैसे नसतानाही टॅक्सीने केला प्रवास
सलमान खानने सांगितलं की, मी कॉलेजला असतानाची एक गोष्ट आहे. त्यावेळी माझ्याकडे जास्त पैसे नसायचे. तसंच एकेदिवशी मला कॉलेजला लवकर पोहोचायचं होतं. त्यामुळे मी एक टॅक्सी बोलावली आणि टॅक्सीत बसलो. जेव्हा मी टॅक्सीने कॉलेजला पोहोचलो तेव्हा ड्रायव्हरने मला पैसे मागितले. मग मी त्याला थोडावेळ थांबण्यास सांगितले आणि मी तिथून निघून गेलो ते परत आलोच नाही.
काही वर्षांनंतर परत तोच टॅक्सी ड्रायव्हर भेटला
पुढे सलमानने सांगितलं, काही वर्षांनंतर माझी त्याच टॅक्सी ड्रायव्हरसोबत भेट झाली. झालं असं की, मी मॉडलिंग करत होतो आणि मला पैसेही चांगले मिळत होते. एकेदिवशी मी टॅक्सी बुक केली होती. त्यावेळी योगायोगाने तोच टॅक्सी ड्रायव्हर आला. त्यावेळी संपूर्ण प्रवासात तो मला एकच बोलत होता की, मी तुला कुठेतरी पाहिलंय. पण, त्याला आठवलंच नाही. मग जेव्हा मी घरापाशी आल्यावर टॅक्सीतून उतरलो आणि त्याला बोललो की, मी वरती जाऊन पैसे घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही थांबा. तेव्हा ड्रायव्हरला आठवलं आणि आम्ही एकमेकांकडे बघून हसलो. त्यानंतर मी त्याचे सगळे पैसे त्याला परत केले.