मुंबई : विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा काही दिवसांपूर्वीच द काश्मीर फाईल्स हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे द काश्मीर फाईल्स या चित्रपटाने धमाका केला. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. विवेक अग्निहोत्री याच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर (Box office) अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. चाहत्यांनी या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले.
द काश्मीर फाईल्स चित्रपटामध्ये 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून लोकांनी संताप देखील व्यक्त केला. इतकेच नाही तर द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या रिलीजनंतर विवेक अग्निहोत्री यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आला. ज्यानंतर सरकारने त्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली.
आता नुकताच आशा पारेख यांनी विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाना साधलाय. यावेळी अत्यंत मोठे भाष्य करताना आशा पारेख दिसल्या. नुकताच आशा पारेख यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीवेळी त्यांना द काश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे चित्रपट बघितले का विचारण्यात आले. यावर त्यांनी मोठा खुलासा केला.
आशा पारेख म्हणाल्या की, मी द काश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी हे दोन्ही चित्रपट बघितले नाहीयेत. जर लोकांना हे चित्रपट आवडत असतील तर त्यांनी नक्कीच बघायला हवेत. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोलताना आशा पारेख या म्हणाल्या की, चित्रपटाच्या प्रोड्यूसर 400 कोटी रूपये कमावले आहेत.
तर त्यांनी हे पैसे त्यांच्या हिंदू कश्मीरी लोकांना दिले? जे आता सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये राहतात. ज्यांच्या जवळ आता पाणी आणि लाईट देखील नाहीये. 400 कोटींमधून 200 किंवा 50 कोटी दिले का? आता आशा पारेख यांनी केलेल्या या विधानांमुळे जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. आता यावर विवेक अग्निहोत्री हे काय भाष्य करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.