दुसऱ्या लग्नानंतर आशिष विद्यार्थी पीत आहेत ब्लॅक मिल्क कॉफी, फॅन्सना पडलाय वेगळाच प्रश्न…
अभिनेते आशिष विद्यार्थी सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे बरेच चर्चेत आहेत. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपूरमध्ये अनोख्या कॉफीचा स्वाद घेतला.
नागपूर : वयाच्या 60 व्या वर्षी लग्न केल्यामुळे अभिनेते आशिष विद्यार्थी (ashish vidyarthi) सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी कलकत्ता येथे रुपाली बरूआ हिच्याशी रजिस्टर मॅरेज केले. आशिष यांचा हा दुसरा विवाह आहे. 22वर्षांपूर्वी त्यांनी अभिनेत्री राजोशी बरूआ यांच्याशी लग्न केले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी ते दोघेही सामंजस्याने वेगळे केले.
त्यानंतर आशिश यांनी रुपाली यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांचे कुटुंबिय आणि मित्र-मंडळी यांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला. मात्र त्यांच्या या दुसऱ्या विवाहाची खूप चर्चा असून त्यानंतर आशिष यांनी तसेच त्यांची पहिली पत्नी रुपाली यांनीही आपापली बाजू स्पष्टपणे मांडली. दोघेही वेगळे झाले असले तरी ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि एकमेकांच्या आनंदात आनंद मानतात. तरीही अनेक लोकांना बरेच प्रश्न पडले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आशिष यांना नवा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नसून तो एक फूड व्हिडीओ आहे, असं आपण म्हणू शकतो. आशिष विद्यार्थी यांचा स्वत:चा एक व्लॉग असून ते वेगवेगळे खाद्यपदार्थ त्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असतात. अवघ्या काही तासांपूर्वी त्यांनी नागपूरमधून एक व्हिडीओ शेअर केला असून तेथे एका कॉफी शॉपमध्ये त्यांनी अनोख्या कॉफीचा स्वाद घेतला आहे.
आशिष व त्यांची काही मित्रमंडळी एका कॅफेमध्ये बसले असून तेथे त्यांनी पहिल्यांदाच Blacksmith coffee चा आस्वाद घेतला. आशिष यांना त्याचा स्वाद आवडला असून त्यासंदर्भातील प्रतिक्रियाही त्यांनी शेअर केली आहे. या कॉफीमध्ये त्यांनी ब्लॅक मिल्क म्हणजे काळं दूध घालून ती प्यायली आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ हजारो लोकांनी लाईक केला असून काही युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी त्यांचे लग्नाबद्दल अभिनंदन केले आहे. तर काही युजर्सनी त्यांना खाण्यासाठी आपल्या शहरातही निमंत्रण दिले आहे. तर एका युजरने ‘ चश्मा का करिश्मा’ अशी कॅप्शनही या व्हिडीओला चालली असती अशी कमेंटही केली आहे.