अभिनेते कबीर बेदी यांनी एकदा नाही तर चार वेळा लग्न केलं आहे. चौथं लग्न त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी केली. आपल्याहून 30 वर्षांनी लहान असलेल्या परवीन दोसांझशी त्यांनी लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री सुहासिनी मुळे यांना त्यांच्या आयुष्यातील जोडीदार खूप उशिरा भेटला. पण जेव्हा तो जोडीदार भेटला, तेव्हा त्यांनी कशाचीही पर्वा न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी फेसबुक फ्रेंडशी लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
अभिनेत्री नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य जणू खुल्या किताबासारखंच आहे. विवियन रिचर्ड्सशी अफेअरनंतर त्यांनी एकटीने मुलीचा सांभाळ केला. अखेर वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी विवेक मेहरा यांच्याही लग्न केलं.
अभिनेते, मॉडेल आणि फिटनेस फ्रीक मिलिंद सोमण यांनी वयाच्या 52 व्या वर्षी अंकिता कोनवारशी लग्न केलं. या दोघांच्या वयातील अंतर त्यावेळी खूप चर्चेत होता.