Ashish Vidyarthi : इंंडस्ट्रीमधील खलनायक आशिष विद्यार्थींनी दुसरं लग्न केलेली तरूणी नेमकी आहे तरी कोण?

आशिष यांचं हे दुसरं लग्न आहे. तसंच आशिष यांची दुसरी पत्नी रूपाली बरूआ नेमकी कोण आहे? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आज आपण तिच्याबाबत जाणून घ्या.

Ashish Vidyarthi : इंंडस्ट्रीमधील खलनायक आशिष विद्यार्थींनी दुसरं लग्न केलेली तरूणी नेमकी आहे तरी कोण?
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 8:21 PM

मुंबई : अभिनेते आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडचे सुपरस्टार आणि प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या (Ashish Vidyarthi) अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसंच आशिष विद्यार्थी यांचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येत आहे. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांचे विविध फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. त्यामुळे ते चर्चेत देखील असतात. आताही ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे आशिष हे वयाच्या साठीत दुसर्‍यांदा बोहल्यावर चढले आहेत.

आशिष विद्यार्थी हे लग्नबंधनात अडकले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी रूपाली बरूआ यांच्याशी लग्न केला आहे. त्यांनी त्यांचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं केलं असून त्यांचा हा विवाह सोहोळा कोलकाता येथे पार पडला. विशेष सांगायचं झालं तर आशिष यांचं हे दुसरं लग्न आहे. तसंच आशिष यांची दुसरी पत्नी रूपाली बरूआ नेमकी कोण आहे? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल. तर आज आपण तिच्याबाबत जाणून घेणार आहोत.

आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी रूपाली बरूआ या मूळच्या आसामच्या असून त्या एक प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर आहे. त्यांचं स्वतःचं फॅशन स्टोर आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि रूपाली यांची भेट त्यांच्या स्टोअरवर झाली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली आणि काही दिवसांनंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. तर आज आशिष आणि रूपाली यांनी कोर्ट मॅरेज करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

आशिष यांनी त्यांच्या लग्नाबाबत बोलताना सांगितलं की, आयुष्याच्या या टप्प्यावर रूपालीशी लग्न करणं ही एक विलक्षण भावना आहे. तसंच असं म्हटलं जातंय की, आशिष हे मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. आशिष यांचं पहिलं लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.