Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asin I आमिर खान याच्या हिरॉईनच्या आयुष्यात वादळ ! ही अभिनेत्री नवऱ्याला सोडणार का? ‘त्या’ कृतीमुळे चर्चांना जोर

गजनी या सुपरहिट चित्रपटातील असिनची भूमिका चांगलीच गाजली होती. लग्नानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम केला होता. मात्र आता इतक्या वर्षानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारणीभूत आहे आहे तिचं वैयक्तिक आयुष्य...

Asin I आमिर खान याच्या हिरॉईनच्या आयुष्यात वादळ ! ही अभिनेत्री नवऱ्याला सोडणार का? 'त्या' कृतीमुळे चर्चांना जोर
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 10:45 AM

Asin Divorce Rumours : आमिर खानच्या ‘गझनी’ (aamir khan in Gjajini) चित्रपटातील लूकची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा त्यातील कल्पनाचीही झाली. ती आजही सर्वांच्या मनात आहे. ही भूमिका असिनने (Asin) साकारली होती. साऊथमध्ये बरीच प्रसिद्ध असलेल्या असिनने पहिल्याच हिंदी चित्रपटात आमिरसोबत काम करत दमदार पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. काही वर्षांपूर्वी लग्न केल्यावर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला.

मात्र आता असिन पुन्हा चर्चेत आली असून यावेळी त्याला कारणीभूत आहे तिचं वैयक्तिक आयुष्य… असिनच्या वैयक्तिक आयुष्यात सध्या काहीच आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. तिने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पतीसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. एवढेच नव्हे तर तिने पती राहूल शर्मासोबतचे लग्नाचे फोटोही डिलीट केल्याने फॅन्स हैराण झाले आहे. ती पतीपासून विभक्त होत असल्याच्या चर्चांना यामुळे उधाण आले असून सर्वांना हाच प्रश्न पडला आहे.

असिन आणि मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 19 जानेवारी 2016 साली लग्न केलं होतं. हा विवाह सोहळा दिल्लीत पार पडला. त्यानंतर असिनने चित्रपटसृष्टीला बाय-बाय म्हणत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला. 2017 साली त्यांची असिन व राहुल यांची मुलगी अरिन हिचा जन्म झाला. अभिनेता अक्षय कुमार याच्यामुळेच राहुल व असिनची ओळख झाल्याचे सांगण्यात येते.

फक्त तो एक फोटो केला नाही डिलीट

असिन तिच्या पर्सनल आयुष्याबाबत फारशी बोलत नाहीच ना जास्त फोटो शेअर करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील तिच्या 5 वर्षांच्या मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो असतात. मात्र असीनने पती राहुलसोबतचे सगळे, अगदी लग्नाचेही फोटो डिलीट केले आहेत. मात्र त्याच्यासोबतच केवळ एकच फोटो तिने ठेवला आहे, जो त्यांच्या वेडिंग रिसेप्शनचा आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या लग्नाला हजर असतानाचा तो फोटो असून ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देताना असिनने हा फोटो शेअर केला होता. तेवढ्या एकाच फोटोत असिन व तिचा पतीदेखील दिसत आहेत.

फेब्रुवारीतच उचललं हे पाऊल

हे जोडपं विभक्त होत असल्याचा दावा असिन आणि राहुल यांच्या एका फॅन पेजद्वारे करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच असिनने राहुलसोबतचे सर्व फोटो डिलीट केले होते, असेही त्यांनी म्हटले आहे. या पेजच्या ॲडमिनने दोघांचे काही फोटो शेअर केले आणि गेल्या काही काळापासून असिन कशी काही पोस्ट अपलोड आणि डिलीट करत आहे, याबद्दलही लिहीण्यात आले आहे. तिच्या या कृतीमुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अद्याप काहीच कन्फर्म नाही

असिन आणि राहुल यांच्या लग्नात काही वादळ निर्माण झालं आहे का, या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप काही अधिकृत पुष्टी मिळालेली किंवा ठोस माहिती मिळालेली नाही. त्यांच्यापैकी कोणीच या विषयावर भाष्य केलेले नाही. मग असिनने हे फोटो नेमके क डिलीट केले, त्यामागचे कारण काय आहे, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.