KBC 12 | वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी अस्मिता ‘हॉटसीट’वर विराजमान, लातूरच्या लेकीची प्रेरणादायी कहाणी!
लातूरमध्ये (Latur) राहणारी अस्मिता माधव गोरे (Amita Gore), वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या खुर्चीत विराजमान झाली आहे.
मुंबई : लोकप्रसिद्ध टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’चे (KBC) 12वे पर्व सध्या सुरू आहे. कोरोनावर मात करत महानायक अमिताभ बच्चन केबीसीच्या (KBC) सेटवर परतले आहेत. केबीसीच्या कालच्या (6 ऑक्टोबर) भागात स्पर्धक सविता रेड्डी यांनी 12 लाख 60 हजार जिंकल्यानंतर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘हॉटसीट’वर आलेल्या राजस्थानच्या रघुराम यांनी केवळ 6 लाख 40 हजार रुपयांवर हा खेळ थांबवला. या दोन स्पर्धकांनंतर या खुर्चीत विराजमान झाली लातूरची (latur) अस्मिता माधव गोरे! (Asmita Gore) अस्मिताचा केबीसपर्यंतचा प्रवास पाहून खुद्द अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यातही पाणी आले (Asmita Madhav Gore a girl from Latur on KBC 12 hotseat).
हॉटसीटवर विराजमान होणाऱ्या स्पर्धकाची ओळख एका एव्हीमधून करून दिली जाते. लातूरमध्ये (Latur) राहणारी अस्मिता माधव गोरे (Amita Gore), वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी या खुर्चीत विराजमान झाली आहे. तिचा हा प्रवास अत्यंत खडतर होता. तिच्या या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांच्यासह, सेटवर उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
The Shravan Kumar to her parents, ASMITA GORE is here to fulfil her family’s dreams. Watch her in #KBC12 Mon-Fri 9 PM only on Sony. @SrBachchan @SPNStudioNEXT pic.twitter.com/6GW2ue71sh
— sonytv (@SonyTV) October 6, 2020
वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी अस्मिताची धडपड
आपल्या बुद्धीची चुणूक दाखवत हॉटसीटवर विराजमान झालेली अस्मिता (Asmita Gore) केवळ 22 वर्षांची आहे. इतक्या लहान वयात ती आपल्या कुटुंबासाठी मेहनत करत आहे. अस्मिताचे वडील अंध असून, आईदेखील एकाच डोळ्याने पाहू शकते. अस्मिताच्या प्रगतीबद्दल तिची आई, वडिलांना सगळ्या गोष्टी सांगते. जणू काही तिचे वडील आईच्या एका डोळ्यातूनच अस्मिताला पाहतात.
अस्मिताला विदेशात जाऊन तिच्या आई-वडिलांची दृष्टी परत यावी म्हणून शस्त्रक्रिया करायची आहे. आई-वडिलांना आपण कसे दिसतो, काय करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे, म्हणून अस्मिताची धडपड सुरू आहे. (Asmita Madhav Gore a girl from Latur on KBC 12 hotseat)
केबीसी मंचावर अस्मिताच्या वडिलांची हजेरी!
नेत्रहीन असलेले माधव गोरे कायमच लेकीलाच्या मागे भक्कम आधार बनून उभे राहिले आहेत. अस्मिताच्या केबीसी (KBC) प्रवासातही ते तिच्या सोबत आले होते. अस्मिताची जिद्द आणि तिच्या वडिलांचा पाठिंबा यासह केबीसीच्या खेळाला सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांनी अस्मिताला सलाम करत, शुभेच्छा दिल्या.
अस्मिताच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली आणि काही प्रश्नानंतर वेळ संपल्याचा गजर वाजल्याने अस्मिताला खेळ थांबवावा लागला. परंतु, महाराष्ट्राच्या या लेकीची जिद्द अवघ्या देशभरासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
(Asmita Madhav Gore a girl from Latur on KBC 12 hotseat )