Salman Khan I सलमानचा शहनाज गिलला Move on करण्याचा सल्ला, अभिनेत्रीने काय दिला रिप्लाय?

अभिनेत्री शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नातं किती पक्क होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज अजूनही त्याची आठवण काढत असते. इमोशनल लेव्हलवर ती अजूनही त्या आठवणींमधून बाहेर आलेली नाही, सिद्धार्थला विसरू शकलेली नाही.

Salman Khan I  सलमानचा शहनाज गिलला Move on करण्याचा सल्ला, अभिनेत्रीने काय दिला रिप्लाय?
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 10:33 AM

मुंबई : ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi ka bhai kisi ki jaan ) या अभिनेता सलमान खानच्या (salman khan) बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी लाँच करण्यात आला. सलमानसह या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल (shehnaaz gill) , भूमिका चावला, सिद्धार्थ निगम, जगपती बाबू, राघव जुयाल, पलक तिवारी हे कलाकारही दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी (trailer launch)सर्व टीम हजर होती. यावेळी कलाकारांशी काही संवादही साधण्यात आला.

या चित्रपटाच्या ट्रेलरला जेवढा रिस्पॉन्स मिळत आहे तेवढीच चर्चा या ट्रेलर लाँचच्या इव्हेंटचीही होत आहे. आणि का होऊ नये बरं? त्या इव्हेंटमध्ये सलमान खानने शहनाज एक महत्वाचा सल्लाही तसाच दिला आहे ना.

काय म्हणाला सलमान खान ?

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री शहनाज गिल आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं नातं किती पक्क होतं, हे सगळ्यांनाच माहीत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज अजूनही त्याची आठवण काढत असते. तिचं भाषणं किंवा इंटरव्ह्यूदरम्यान त्याचा उल्लेखही करत असते. यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे, शहनाज अजूनही सिद्धार्थच्या आठवणीत गुरफटलेली आहे. आयुष्याच इमोशनल लेव्हलवर ती अजूनही पुढे सरकू शकलेली नाहीये.

आणि ही गोष्ट सलमानलाही माहीत आहे. सलमान व शहनाजचा चांगला बाँड आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटदरम्यान शहनाजला प्रश्न विचारण्यात आला की ती आयुष्यात किती पुढे गेली आहे ? तिने त्याचे उत्तर देण्यापूर्वीच सलमान म्हणाला, ‘ मूव्ह-ऑन शहनाज. आता मूव्ह ऑन कर. आता झालं सगळं. मूव्ह-ऑन.’ , सलामान खानचं हे बोलणं ऐकून शहनाज काही सेकंदांसाठी सुन्न झाली आणि नंतर हसली. पण त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, – सलमान सर काय म्हणाले, ते मी समजू शकले नाही.

शहनाजचे स्वप्न

त्यानंतर सलमान खान पुन्हा म्हणाला – मी तुला असं सांगतोय की आता (आयुष्यात) पुढे जा. (move on in life). तेव्हा शहनाजला त्याच्या वाक्याचा संदर्भ समजला आणि ती म्हणाली – कर गई (हो, मी झाले move on ).. नंतर शहनाजने या चित्रपटात काम करण्याचा अनुभवही शेअर केला. ती म्हणाली – हा माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद क्षण आहे, की मी सलमान सरांच्या मागे उभी राहू शकले आहे. मी पहिला म्युझिक व्हिडीओ केल्यानंतर चित्रपटांसाठी प्रयत्न केले, तेव्हा मी रिजेक्ट झाले. एखादी लहान मुलगी समजून मला हाकलून दिलं. तेव्हा मी खूप रडले होते, पण आईने माझी समजूत घातली. ती म्हणाली, तू बिलकूल रडू नकोस, एक दिवस असा येईल जेव्हा तू सलमान खानसोबत चित्रपटात काम करशील.’ ते स्वप्न आज खरं झालंय, मी खूप खुश आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. एवढंच नव्हे तर तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट असून ती त्यांच्या चित्रीकरणात व्यस्त असते.

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची ओळख बिग बॉस 13 मध्ये झाली होती, तिथे ते खूप चांगले मित्र बनले. अनेक वेळा त्यांनी एकमेकांप्रती असलेल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडली होती. मात्र 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ शुक्लाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर शहनाज अतिशय खचली होती. बऱ्याच काळापर्यंत ती मीडिया व लाईम लाइटपासून दूर होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.